ETV Bharat / city

Mumbai Corona Update : चाचण्या कमी केल्याने रुग्णसंखा घटली, १७४५ नवे रुग्ण, १ मृत्यू

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.  झाली. ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६ रुग्णांची नोंद झाली. मात्र गेल्या २४ तासात चाचण्या कमी झाल्याने १७४५ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १० हजार ०४७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

corona file photo
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Jun 11, 2022, 8:29 PM IST

मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. झाली. ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६ रुग्णांची नोंद झाली. मात्र गेल्या २४ तासात चाचण्या कमी झाल्याने १७४५ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १० हजार ०४७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

१७४५ नवे रुग्ण - मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार २२७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १७४५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ८८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ७८ हजार ९४४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४९ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १० हजार ०४७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५६१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१२२ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १७४५ रुग्णांपैकी १६४६ म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ९४१ बेड्स असून त्यापैकी ३८९ बेडवर रुग्ण आहेत.

रुग्णसंख्या वाढतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५ रुग्णांची नोंद झाली आहे.

१०५ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.