मुंबई - कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत शुक्रवारी नव्याने 933 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 17 हजार 512 वर पोहचला आहे. तर, मुंबईत शुक्रवारी 34 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 655 वर पोहचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत शुक्रवारी नव्याने 933 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 702 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 231 रुग्ण 12 व 13 मे ला खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 17512 वर पोहचला आहे.
मुंबईत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 24 मृत्यू हे गेल्या 24 तासात झाले आहेत . तर 10 मृत्यू 10 ते 12 मे दरम्यान झाले आहेत. त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचा अहवाल येणे बाकी होता. हा अहवाल आल्यावर या दहा जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 34 मृतांपैकी 16 जणांना दिर्घकालीन आजार होते. 34 मृतांपैकी 21 पुरुष तर 13 महिला रुग्ण आहेत. मृतांपैकी 3 जणांचे वय 40 वर्षाखाली, 13 जणांचे वय 60 वर्षावर तर 18 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज कोरोनाचे 334 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत मुंबईमधून 4568 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.