मुंबई - गेल्या काही दिवसांपासून काही प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मुंबईत आज कोरोनाचे 654 रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधून आज 311 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबईत आज (शुक्रवारी) 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 89 हजार 343 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 959 वर पोहोचला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 65 हजार 282 वर गेला आहे. सध्या, मुंबईत 12 हजार 274 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा-नीतू कपूर यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, मुलगी रिद्धिमाने दिला दुजोरा
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 305 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 305, दिवस तर सरासरी दर 0.23 टक्के आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 434 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 4 हजार 975 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 20 लाख 61 हजार 094 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- लस देण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार, स्टोरेज उपलब्ध - पालकमंत्री भुजबळ
-अशी वाढली रुग्णसंख्या
16 नोव्हेंबर - 409 रुग्ण
17 नोव्हेंबर - 541 रुग्ण
18 नोव्हेंबर - 871रुग्ण
19 नोव्हेंबर - 924 रुग्ण
20 नोव्हेंबर - 1031 रुग्ण
21 नोव्हेंबर - 1092 रुग्ण
22 नोव्हेंबर - 1135 रुग्ण
23 नोव्हेंबर - 800 रुग्ण
कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर -576 रुग्ण
2 नोव्हेंबर -706 रुग्ण
3 नोव्हेंबर -746 रुग्ण
6 नोव्हेंबर -792 रुग्ण
9 नोव्हेंबर -599 रुग्ण
10 नोव्हेंबर- 535 रुग्ण
14 नोव्हेंबर -574 रुग्ण
16 नोव्हेंबर -409 रुग्ण
कोरोना लसीच्या नियोजनासाठी महापालिकेची ब्ल्यू प्रिंट-
कोरोना विषाणूवर लवकरच लस उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी ब्लू प्रिंट बनवली आहे. मुंबईत पाच टप्प्यांत लसीकरण होणार असून, पहिल्या टप्प्यात सव्वा लाख डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकी ५ कर्मचाऱ्यांची ५०० पथके तयार ठेवणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि सिटी टास्क फोर्सचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांनी दिली. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्ण संख्या आटोक्यात आली. त्यानंतर पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली होती.