ETV Bharat / city

रिचर्डसन क्रुडास, गोरेगावच्या ‘नेस्को’ कोविड सेंटरमध्ये 2 हजार ऑक्सिजन बेड वाढणार - मुंबईत कोविड सेंटरमध्ये 2 हजार ऑक्सिजन बेड वाढणार

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करून देण्यासाठी २२०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याने मोठी सुविधा निर्माण झाली. याच धर्तीवर उपलब्ध बांधकामात गेल्या एकाच महिन्यात दीड हजार बेड सज्ज करण्यात आले आहेत. यामध्ये ५०० नियमित आणि एक हजार ऑक्सिजन बेड असतील अशी माहिती ‘नेस्को-२’चे डीन डॉ. संतोष सलागरे यांनी दिली.

new 2,000 oxygen beds in mumbai Jumbo Covid Center
मुंबईत कोविड सेंटरमध्ये 2 हजार ऑक्सिजन बेड वाढणार
author img

By

Published : Jun 22, 2021, 7:48 AM IST

मुंबई - कोरोनाची तिसर्‍या लाटेचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सिजन बेडची मागणी वाढली होती. या पार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड वाढवण्यात येत आहेत. भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास आणि गोरेगाव येथील ‘नेस्को’ जम्बो कोविड सेंटर- २ मध्ये प्रत्येकी एक हजार ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत. तसेच पोदारमध्ये ३० आयसीयू घेतले जाणार आहेत.

ऑक्सिजन बेड वाढणार -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या दहा हजारांवर गेली असताना दररोज ऑक्सिजन बेडची आवश्यकता असणारे रुग्णही वाढले होते. मात्र पालिकेने आपली सर्व यंत्रणा सक्षम ठेवल्याने मुंबईत कोणतीही दुर्घटना घडली नाही. पालिकेच्या उपाययोजनांमुळे १६८ रुग्णांना सुरक्षितरीत्या हलवल्याने मोठा अनर्थ टळला होता. असे असले तरी तिसर्‍या लाटेत दुसर्‍या लाटेपेक्षा जास्त वेगाने रुग्णसंख्या वाढण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची व्यवस्था पालिकेच्या माध्यमातून तैनात ठेवण्यात येत आहे. भायखळ्याच्या रिचर्डसन क्रुडास कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड सुरू करण्याची मागणी करण्यात आल्यामुळे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही प्रशासनाला दिले होते. या पार्श्वभूमीवर ४ कोटी ५३ लाख ४६ हजार रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

new 2,000 oxygen beds in mumbai Jumbo Covid Center
रिचर्डसन क्रुडास, गोरेगावच्या ‘नेस्को’ कोविड सेंटरमध्ये 2 हजार ऑक्सिजन बेड

‘नेस्को-२’मध्ये फॅमिली वॉर्ड -

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करून देण्यासाठी २२०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याने मोठी सुविधा निर्माण झाली. याच धर्तीवर उपलब्ध बांधकामात गेल्या एकाच महिन्यात दीड हजार बेड सज्ज करण्यात आले आहेत. यामध्ये ५०० नियमित आणि एक हजार ऑक्सिजन बेड असतील अशी माहिती ‘नेस्को-२’चे डीन डॉ. संतोष सलागरे यांनी दिली. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना जास्त धोका वर्तवण्यात आल्यामुळे ‘नेस्को-२’मध्ये ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी २५० बेड असतील. बाधित मुलांसोबत गरज असल्यास पालकही थांबू शकणार आहेत. शिवाय या ठिकाणी मुलांसाठी सापशिडी, ल्युडो अशा गेमसह रीडिंग, हिरवळ, मनोरंजनाची व्यवस्था असेल. भिंती कार्टूनने रंगवण्यात येतील, अशी माहितीही डॉ. सलागरे यांनी दिली.

ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटरची सद्यस्थिती -

पालिका आणि ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालये व जम्बो सेंटरमधील बेडनुसार मुंबईत १० हजार ९३० ऑक्सिजन बेड आहेत. यातील १९०६ बेडवर रुग्ण दाखल असून ९ हजार २४ बेड रिक्त आहेत. तर एकूण २६३३ आयसीयूपैकी १२१६ आणि एकूण १४५० पैकी ५४२ व्हेंटिलेटर सध्या रिक्त आहेत.

हेही वाचा - मुंबईत रेकॉर्ड ब्रेक लसीकरण, एका दिवसात 1 लाख 8 हजार नागरिकांना लस

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.