मुंबई - एलफिस्टन पूल आणि अंधेरी गोखले पुल पडल्यानंतर बीएमसी, IIT- मुंबई आणि रेल्वेने मुंबईतील ४४५ FOB/ROB चे ऑडिट केले होते. ज्यामध्ये काही पुल तोडून नवीन बांधण्याचे सूचित केले होते. तर काहींचे डागडुजीकरण करण्याचे ठरले होते. गुरुवारी सीएसएमटी स्टेशन परिसरातील जो पादचारी पुल पडला त्याचेही ऑडिट करण्यात आले होते. परंतु, ऑडिट करणाऱ्या विभागाने कामात हलगर्जीपणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळेच हा पूल कोसळून ६ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. हा पूल १९८४ साली बांधला होता. याबाबतची माहिती शकील अहमद यांनी माहिती अधिकारामार्फत मिळवली आहे.
आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर असणारे काही FOB/ROB पूल आहेत. ज्यांची बांधणी कधी झाली होती, पुलांचे निरीक्षण करण्यासाठी एकूण किती निरीक्षक होते आणि पूल निरीक्षण करणाऱ्या निरीक्षकांच्या हातात किती जबाबदारी आहे, यासारख्या अनेक प्रश्नांची त्यांना धक्कादायक माहिती आरटीआयमधून प्राप्त झाली आहे. यामध्ये सीएसटी ते कर्जत आणि कसारायामध्ये एकूण ७१ ROB आहेत. तर, १६३ FOB पश्चिम रेलवेवर चर्चगेट ते सूरतच्या दरम्यान १४६ FOB आहेत. एकूण ४६ ROB आहेत. तर २०० हुन अधिक पूल हे धोकादायक परिस्थितीत आहेत.
गुरुवारी जो सीएसटी पादचारी पुल पडला त्याची बांधणी १९८४ झाली होती. यामध्ये बीएमसी, IIT- मुंबई आणि रेल्वे ऑडिट केले होते, तर हा पुल पडला कसा? ऑडिट दलाला पुल निकामी झाल्याची माहिती नव्हती का? असे प्रश्न आता या माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून उपस्थित होत आहेत.
ऑडिट दलाने FOB/ROB पुलांची तोडणी व डागडुजी करण्यासाठी पाठवलेली यादी
१) येलो गेट FOB मस्जिद पूर्व
२) एमके रोड चंदनवा़डी FOB मरीन लाइंस
३) एमके रोड चंदनवाड़ी FOB RLY मरीन लाइंस
४) हंसा भुगरा मार्ग पाईप BRIDGE
५) एसबीआई कॉलोनी, BRIDGE
६) गांधी नगर कुरार गाव, BRIDGE
७) वालभात नाला गोरेगांव, BRIDGE
८) रामनगर चौक, दहिसर, BRIDGE
९) विट्ठल मंदिर, दहिसर, BRIDGE
१०) एसव्हीपी रोड, दहिसर BRIDGE
११) अकुर्ली रोड, दहिसर, BRIDGE
१२) हरी मस्जिद, साकीनाका, BRIDGE
१३) तिलक नगर, FOB RLY
१४) बर्वे नगर, घाटकोपर FOB
आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी ही माहिती सादर करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 15 लाख व जखमींना 5 लाख देण्याची मागणी केली आहे.