ETV Bharat / city

Neelam Gorhe on MIM : 'एका बाजूला नागनाथ तर एका बाजूला सापनाथ' - Maharashtra Foundation Day

एका बाजूला एमआयएम आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाची सुपारी घेऊन सगळे काम चालवले आहे, अशा शब्दात नीलम गोऱ्हे (Shivsena Leader Neelam Gorhe) यांनी राज ठाकरे आणि एमआयएमवर ( Neelam Gorhe on MIM ) टीका केली आहे.

Neelam gorhe
Neelam gorhe
author img

By

Published : May 1, 2022, 7:06 PM IST

मुंबई : एका बाजूला एमआयएम आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाची सुपारी घेऊन सगळे काम चालवले आहे. म्हणून मला एका वाक्याची आठवण येते की एका बाजूला सापनाथ आहे आणि एका बाजूला नागनाथ आहे. हे समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोपही नीलम गोऱ्हे (Shivsena Leader Neelam Gorhe) यांनी लगावला. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या (Maharashtra Foundation Day) 62 वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या हुतात्मा चौकात (Hutatma Chowk) आल्या होत्या.

नीलम गोऱ्हे यांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा तर मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची बुस्टर डोस सभा होत आहे. या दोन्ही सभेचा शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Shivsena Leader Neelam Gorhe) यांनी समाचार घेतली आहे.

केंद्राबरोबर पाठपुरावा करुन राज्याचं भलं कराव
याप्रसंगी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 'बूस्टर डोसने संजीवनी भेटते. परंतु हा कसला बूस्टर डोस देणार त्याचा विचार करायला हवा. त्याचबरोबर मला असं वाटतं की सातत्याने आरोप करून जे राज्य सरकारचं चांगलं काम आहे. ही महत्त्वाची विधेयके विधिमंडळात पास झालेली आहेत. अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा विचार करायला हवा. परंतु फक्त राज्य सरकारवर टीका करण्याचे काम हे विरोधी करत आहेत.'

'१ मे या दिवशी देवेंद्र फडणीस यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी जर का पावले उचलली तर बरं होईल. त्यांनी इथे अनेक वेळा आश्वासने दिलेली आहेत. केंद्र सरकारकडून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे जीएसटी चे पैसे परत मिळवण्या साठी प्रयत्न करायला हवेत. याच बरोबर बेळगाव-कारवार चा प्रश्न असेल. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलविण्याचे नतद्रष्ट कारस्थान कर्नाटक या राज्यांमध्ये होत आहे. त्या विषयावर काही पावले उचलली तर ते राज्याबरोबर देशात सुद्धा त्यांचं नेतृत्व चांगलं होईल.' असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

मनसे फक्त माध्यम दूत
'विशेष म्हणजे सध्या सभांबाबत बोलले जात आहे. सध्या बऱ्याच वाहिन्यांवर सभांविषयी दाखवले जात आहे. पूर्वी काही लोक असं म्हणत होते, की पूर्वी काही जण आकाशात उडू शकायचे, पाताळात उडू शकायचे, काही समुद्र कन्या होत्या. तसेच आता मनसे माध्यमातून आता माध्यम दूत म्हणून उडत आहे असा अशी टीकाही त्यांनी मनसे पक्षावर केली आहे. ते फक्त माध्यमातून उडत असतात. परंतु जमिनीवर कुठेही त्यांची परिणामकारकता दिसली नाही. अनेक निवडणुका मागून निवडणुका गेल्या पण त्यांचा पक्ष कुठेच दिसत नाही,' असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

भाजपची सुपारी घेऊन काम सुरू आहे?
निवडणुकीच्या वेळेला राज ठाकरे यांनी स्वतः पक्षाचा झेंडा बदलला. वाटेल ती टीका ते करत आहेत. ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि आम्ही अयोध्येला गेलो होतो, तेव्हा तुम्हाला उत्तर भारतातले देव लागतात अशा पद्धतीचे विद्वत्तापूर्ण विचार त्यांनी मांडले. राम हे उत्तर भारताचेच आहेत असं तेव्हा आम्हाला संशोधन झालं. त्यामुळे अशावेळेला आज हनुमान चालीसा आणि धार्मिक गोष्टींचा वापर केवळ आणि केवळ राजकीय हत्यार म्हणून करत आहेत. आणि त्या संदर्भामध्ये कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे.
हेही वाचा - CM Uddhav Thackeray Criticized Raj Thackeray : असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिलेत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.