ETV Bharat / city

'व्हीव्हीपॅटसोबत मतदान जुळत नसल्याच्या तक्रारींबाबत चौकशी होणे आवश्यक' - Neela Satyanarayan interview

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये खूप ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे वृत्त माध्यमांवर दिसून आले. हे जर खरे असेल तर त्याची चौकशी व्हावी, असे निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी म्हटले आहे.

author img

By

Published : Apr 27, 2019, 8:12 PM IST

मुंबई - गुजरातमधील खासगी कंपनीकडून ईव्हीएम मशीन निवडणुकीसाठी आणण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे. तेथूनच ईव्हीएम मशीन आणण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल राज्याचे माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी एका मुलाखतीत विचारला होता. याबाबत विचारले असता त्यांनी व्हीव्हीपॅटप्रमाणे मतदान झाले नसल्याच्या तक्रारीबाबत चौकशी होण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले. यावेळी मुलाखतीमधील प्रश्न राज्यातील निवडणुकीसंदर्भात नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

काही ठिकाणी व्हीव्हीपॅटवर ज्या व्यक्तीला मतदान केले त्याचे नाव आले नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. हे सर्व पुराव्यानिशी समजू शकते. त्यामुळे त्याची चौकशी होण्याची गरज राज्याचे माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये खूप ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे वृत्त माध्यमांवर दिसून आले. हे जर खरे असेल तर त्याची चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले.

नीला सत्यनारायण

काय झाली होती माध्यमांवर चर्चा -
दरवर्षीप्रमाणे ईव्हीएम मशीन या ठरवलेल्या बंगलोर आणि इतर शहरातील सरकारी विश्वासातील कंपनीकडून किंवा निवडणूक आयोगाकडून मागविल्या जातात. त्या मागविलेल्या मशीनवर सरकारची व लोकांची विश्वासहर्ता असते. अचानक मागील निवडणुकीत आणि या यंदाच्या निवडणुकीत मशीन्स या गुजरातमधून मागवण्यात आल्याचे बोलले जाते. ते का? आणि जर मशीन बिघडल्या तर त्या तिकडेच दुरुस्तीसाठी पाठवाव्या लागतात. मग हे असे का? असा सवाल माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी माध्यमावरील चर्चेदरम्यान विचारला होता. परंतु, हे प्रश्न महाराष्ट्राच्या निवडणुकीला अनुसरून विचारले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Intro:ईव्हीएम मशीन गुजरातमधून का ? असा प्रश्न चॅनेल डिस्कशनमध्ये विचारला होता यंदाचा निवडणुकीला अनुसरून नाही; पण त्यात गैरप्रकार घडतं असेल तर चौकशी व्हावी- माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण

Mh_mum_neela_evm_mashine_byte

गुजरातच्या सुरत मधील खाजगी कंपनीकडून ईव्हीएम मशीन आणल्या गेल्या असे वृत्त माध्यमांवर फिरत आहे. तिथूनच ईव्हीएम मशीन आणण्या मागचे नेमके कारण काय असा सवाल राज्याचे माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी एका वृत्तवाहिनेला मुलाखत दिली तेव्हा म्हटल्याचे बोलले जात आहे.काही वर्षे प्रत्येयक निवडणूकिला सरकारी भेल कंपनीतुन किंवा निवडणूक आयोगाकडूनचं ईव्हीएम मशिन्स मागवल्या जात होत्या अचानक मागील निवडणूकित आणि या यंदाच्या निवडणूकित त्यांचा माहितीनुसार त्यांनी एका पाहिलेल्या वृत्तानुसार मशिन्स या गुजरातमधील मागवल्या आहेत. ते का ? आणि जर मशीन बिघडल्या तर त्या तिकडेच दुरुस्ती करता येत नाही त्या तिकडेच पाठवाव्या लागतात असे तर मग हे असं का ?अस त्यांनी एका चॅनेल डिस्कशन दरम्यान म्हटले होते.परन्तु आजच्या बातमीला व महाराष्ट्रातील निवडणूकिला अनुसरून म्हटलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे .

दरवर्षी प्रमाणे ईव्हीएम मशिन्स या ठरवलेल्या बंगलोर आणि इतर शहरातील सरकारी विश्वासातील कंपनिकडून किंवा निवडणूक आयोगाकडुन ईव्हीएम या मशिन्स मागवल्या जातात त्या मागवलेल्या मशिन्सवर कंपनीवर सरकारची शासनाची व लोकांची विश्वास अहर्ता असते परन्तु मागील निवडणूकित व यंदाच्या निवडणूकित ईव्हीएम मशिन्स या गुजरातमधील सुरत येथील खासगी कंपनी कडून मागवले आहेत. ते का ? हा प्रश्न आता त्यांनी मागे चॅनेल डिस्कशन मध्ये म्हटल्यानुसार आता विचारत नसल्या तरी ते माध्यमांवर लोकांकडून विचारला जात आहे .त्या मशिन्समध्ये आता नुकत्याच झालेल्या निवडणूकित खूप ठिकाणी गैरप्रकार घडल्याचा घटनावृत्त माध्यमांवर पाहायला मिळाल्या हे जर खरं असेल तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे असे माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी यावेळी सांगताना आवर्जून म्हटले आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.