मुंबई - कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्स प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. समीर खान आणि इतर दोन आरोपी, राहिला फर्निचरवाला आणि करण सेजनानी यांच्यवर एनडीपीएस ॲक्टच्या कलम 8 (सी), 20 (बी) (सी), 27 ए, 27, 28 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विशेष एनडीपीएस न्यायालयानचे न्यायाधीश ए.ए. जोगळेकर यांच्यापुढे समीर खान यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा रासायनिक विश्लेषण अहवाल सादर करण्यात आला. ज्यामधले 18 नमुन्यांपैकी 11 नमुन्यांमध्ये गांजा नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे समीर खान ह्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी समीर खानचा जामीन अर्ज तपास चालू असल्याच्या कारणावरून फेटाळण्यात आला होता.
हेही वाचा - अभिनेत्री नोरा फतेही अन् जॅकलीन फर्नांडिस चौकशीसाठी 'ईडी' कार्यालयात दाखल