मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात राज्यभर आंदोलने होत आहेत. आज (गुरुवार) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करुन पडळकरांचा निषेध नोंदवला.

आमदार पडळकर आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालय दणाणून सोडले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मुंबई, ठाणेसह परिसरातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजप आणि पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पडळकर यांच्या प्रतिमेला चप्पल ने मारून संताप व्यक्त केला.