ETV Bharat / city

सहकार क्षेत्राला केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा सोडवतील, जयंत पाटलांचा उपरोधक टोला - मुंबई लेटेस्ट न्यूज

गुजरात व महाराष्ट्रात सहकार आहे. गुजरातचा सहकार आहे, जो अमित शहा एक बँक चालवत होते, अशी माझी माहिती आहे. नोटबंदीच्या काळात जास्त नोटा एक्स्चेंज करण्यात आल्या. त्यांच्या बँकेचे नाव सर्वात पुढे आले होते. अमित शहा यांना सहकाराचा जास्त अनुभव आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

जयंत पाटील
जयंत पाटील
author img

By

Published : Jul 8, 2021, 10:37 PM IST

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर बंधने घातली आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधने घालत आहे. त्यांची स्वायत्तता धोक्यात आणली जात असून या सगळ्या जाचातून अमित शहा या सेक्टरला सोडवतील, असा उपरोधक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. तसेच शहा यांच्या नेमणूकीचे त्यांनी स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

'जाणीवपूर्वक कायद्यात दुरुस्त्या'

देशातील सर्व बँकींग व्यवसायावर अन्याय होतो आहे. रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर नव्याने बंधने आणली आहेत. नाबार्डवर देखील जाणीवपूर्वक कायद्यात दुरुस्त्या करुन केंद्रसरकारने त्यांच्यावर अंकुश निर्माण केला आहे. शरद पवार यासंदर्भात एक-दोन दिवसात महाराष्ट्रातील आणि देशातील बँकींग सेक्टरला व सहकार सेक्टरला कसे संकटात आणलेले आहे, हे निदर्शनास आणून देणार असल्याचे पाटील म्हणाले.

'सर्वाधिक नोटा बदलल्या'

गुजरात व महाराष्ट्रात सहकार आहे. गुजरातचा सहकार आहे, जो अमित शहा एक बँक चालवत होते, अशी माझी माहिती आहे. नोटबंदीच्या काळात जास्त नोटा एक्स्चेंज करण्यात आल्या. त्यांच्या बँकेचे नाव सर्वात पुढे आले होते. अमित शहा यांना सहकाराचा जास्त अनुभव आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. तसेच गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार याच्यात फारसा फरक नाही. अमित शहा यांच्या नेमणूकीमुळे सहकार चळवळ वाढायला मदत होईल, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा -खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करतंय - जयंत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.