ETV Bharat / city

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप हे भाजपाचे राजकीय षडयंत्र - नवाब मलिक - nawab malik latest news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये देण्याबाबतचे आरोप लावले. मात्र याबाबत ईडीने कधीही परमबीर सिंह यांची चौकशी का केली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Jul 17, 2021, 7:02 PM IST

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांची चार कोटी वीस लाखांची स्थावर मालमत्ता ईडी(enforcement directorate)ने (सक्तवसुली संचालनालय) जप्त केली. मात्र या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik ) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ईडीकडून जी मालमत्ता जप्त करण्यात आली, त्या मालमत्तेचा व्यवहार 2004 आणि 2005 साली झाला होता. मग ईडीकडून या मालमत्तेचा संबंध नुकत्याच झालेल्या कथित गैरव्यवहारासोबत कसा जोडण्यात आला, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

'जप्त केलेल्या मालमत्तेचा व्यवहार पंधरा वर्ष आधीचा'

ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत वरळी येथील अनिल देशमुख यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटची मालकी अनिल देशमुख यांच्या पत्नीकडे आहे. हा फ्लॅट 2005साली खरेदी करण्यात आला होता. त्यावेळी असलेले आमदार रामकृष्ण पाटील यांच्याकडून हा फ्लॅट खरेदी करण्यात आला असून, हा फ्लॅट सरकारी जागेत असल्याने त्यावेळेस मालकीहक्क ट्रान्सफर करण्यात अडचण येत होती. मात्र त्यानंतर हा फ्लॅट देशमुख यांच्या पत्नीच्या नावावर करण्यात आला. पण फ्लॅटच्या मालकी हक्काची कागदपत्रे ही 2005मध्येच असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पंधरा वर्षांआधी झालेल्या व्यवहाराचा संबंध ईडीकडून आता कसा काय लावण्यात येत आहे, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला. तसेच उरणमध्ये असलेली जागाही अनिल देशमुख यांच्या मुलाच्या नावावर आहे. या जागेसाठी झालेल्या व्यवहाराची रक्कम हवाला मार्गाने आल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे. मात्र देशमुख कुटुंबीय चालवत असलेल्या एज्युकेशन ट्रस्टला देणगी स्वरूपात आलेल्या रकमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हे पैसे हवाला मार्गाने आल्याचे ईडीकडून आरोप केला जात आहे. 17 वर्षांपूर्वी झालेल्या व्यवहाराचा संबंध आता केलेल्या आरोपांबाबत कसा काय होऊ शकतो, असाही प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे.

'परमबीर सिंह यांची चौकशी का नाही?'

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये देण्याबाबतचे आरोप लावले. मात्र याबाबत ईडीने कधीही परमबीर सिंह यांची चौकशी का केली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. मनसुख हिरेन (mansukh hiren) यांची हत्या करणारा सचिन वाझे (sachin vaze) पोलीस दलात असताना परमबीर सिंह यांच्यासोबत दोन-दोन तास बैठका करत होता. त्याबाबत कुठलीही चौकशी का होत नाही, असा सवालही नवाब मलिक यांच्याकडून विचारण्यात आला आहे.

'राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षड्यंत्र'

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर एकामागून एक आरोप केले जात आहेत. एकनाथ खडसे (eknath khadse) यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीत असताना पक्षांतर्गत वादामुळे एकनाथ खडसे यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. तर जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या कारखान्याशी अजित पवार किंवा त्यांच्या नातेवाईकांचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण नवाब मलिक यांच्याकडून देण्यात आले आहे. केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे तपास यंत्रणेकडून करण्यात आलेले आरोप न्यायालयात टिकणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.