ETV Bharat / city

किशोर वाघ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली नाही - तपासे - राष्ट्रवादीची किशोर वाघ यांच्यावर प्रतिक्रिया

लाच घेतल्या प्रकरणी फडणवीस सरकारने चित्रा वाघ यांच्या पतीवर २०१६ मध्ये निलंबनाची कारवाई केली होती. त्यांची एसीबीमार्फत चौकशी सुरू होती. या तपासानंतर 12 फेब्रुवारी 2021 ला किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे यांनी दिले आहे.

महेश तपासे
महेश तपासे
author img

By

Published : Feb 27, 2021, 3:39 PM IST

मुंबई - लाच घेतल्या प्रकरणी फडणवीस सरकारने चित्रा वाघ यांच्या पतीवर २०१६ मध्ये निलंबनाची कारवाई केली होती. त्यांची एसीबीमार्फत चौकशी सुरू होती. या तपासानंतर 12 फेब्रुवारी 2021 ला किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे यांनी दिले आहे.

सूडबुद्धीने कारवाई नाही

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर स्पष्टीकरणर देताना तपासे यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण २०१६ मधील आहे. आर्थिक व्यवहार करताना किशोर वाघ यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. फडणवीस सरकार त्यावेळी सत्तेत होते. एसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू होती. हा तपास पूर्ण झाल्यानंतर १२ फेब्रुवारी २०२१ ला त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आलेली नाही.

किशोर वाघ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली नाही

व्हायरल फोटोचा निषेध

दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड दोषी आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, याकरिता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हे प्रकरण तापले असताना, चित्रा वाघ आणि राठोड यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करते. तसेच मुंबई पोलीस आणि सायबर शाखेने याबाबत सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.