ETV Bharat / city

'समाजात फूट पाडणाऱ्या भाजपबद्दल विचार करावाच लागेल' - jayant patil

सध्या देशात भाजपची सत्ता आहे. समाजातील सर्व वर्गाला सोबत घेऊन जायचे, ही सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी असते. भारतातील सर्व लोकांना समान अधिकार आहे. परंतु त्यांच्या मनात याबाबत शंका निर्माण केली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Jan 23, 2020, 2:57 PM IST

मुंबई - समाजात फूट करण्याचे काम आजचे केंद्रातील भाजप सरकार करत आहे. या सरकारच्या हातात पुन्हा सत्ता देणे चुकीचे आहे. त्यामुळे यावर आपल्याला विचार करावा लागणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज अल्पसंख्याक विभागाची बैठक राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. त्यावेळी पवार बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... भारतीय राज्यघटनेची ७० वर्षे : विकास, कलम ३७० आणि सीएए..

अल्पसंख्याक समाजाच्या अनेक समस्या आहे. या समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत. सध्या देशात भाजपची सत्ता आहे. समाजातील सर्व वर्गाला सोबत घेऊन जायचे, ही सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी असते. भारतातील सर्व लोकांना समान अधिकार आहे. परंतु, सरकारकडून त्यांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

हेही वाचा... शिक्षा सुनावल्यानंतर ७ दिवसात अंमलबजावणी व्हावी, सरकारची सर्वोच्च न्यायालयात मागणी

पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंकेचा काही भाग आहे. जिथे भारतातील काही लोक राहतात. त्यांनाही आपल्या देशात परत यावे, असे वाटत असेल. तर तो त्यांचा अधिकार आहे. परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना ते मान्य नसल्याचेही शरद पवार म्हणाले. अल्पसंख्याक समाजातील लोकही मोठ्या प्रमाणावर भारतातून बाहेर गेली होती. त्यांना देश स्वतंत्र झाल्यावर परत यायचे आहे, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा... गडचिरोलीमध्ये 18 आयएएस अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

NRC, CAA यामुळे मुस्लीम समाजाला नजरअंदाज केले जात आहे. तर दुसरीकडे भटक्या विमुक्त जातिचे लोक आहेत. जे कामानिमित्त एका जागेवर राहत नाही. अशा लोकांचे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही आपली ओळख दाखवावी लागणार आहे. त्यांना पुरावा द्यावा लागणार आहे. ही वेळ या भाजप सरकारने आणली आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा... 'कँडीक्रश'चा खेळ भोवला, सहकार आयुक्त निलंबित

अल्पसंख्याक विभाग आमच्याकडेच हवा, असे मला सांगण्यात आले होते. त्यानुसार नवाब मलिक यांना या खात्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ते अल्पसंख्याक समाजासाठी काम करतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा... कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण: सागर खोतवर गुन्हा दाखल करा

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. ते व्यवस्थित कसे चालेल, हे पाहिले पाहिजे. सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहे. परंतु काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे. त्या गोष्टीकडे लक्ष देवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांनी केले. तर, देशात आणि राज्यात अल्पसंख्याक विभाग आणि समाज मोठ्या प्रमाणात आहे. या युवकांना रोजगार देण्याचे काम आपले आहे. सत्ता आपल्याकडे आहे. त्यांच्यासाठी काम करायचे आहे, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अल्पसंख्याक सेलच्या बैठकीत व्यक्त केला.

Intro:समाजा-समाजात फूट पाडणाऱ्या भाजपबद्दल विचार करावा लागणार- शरद पवार
mh-mum-01-ncp-sharadpavar-mitting-7201153

मुंबई ता. २३ :
समाजा-समाजात फूट करण्याचे काम आजची भाजप सरकार करत आहे. या सरकारच्या हातात पुन्हा सत्ता देणं चुकीचं आहे त्यामुळे यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

अल्पसंख्याक सेलची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रदेश कार्यालयात पार पडली.

अल्पसंख्याक समाजाची समस्या आहे. त्यांच्या समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत. सध्या देशात भाजपाची सत्ता आहे. समाजातील सर्व वर्गाला सोबत घेऊन जायचं असतं ही सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी असते. भारतातील सर्व लोकांना अधिकार आहे परंतु त्यांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.
पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंकेचा काही हिस्सा आहे. ज्यामध्ये भारतातील काही लोक रहात आहेत त्यांना आपल्या देशात परत यावं वाटत आहे. त्यांचा तो अधिकार आहे परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना ते मान्य नसल्याचेही शरद पवार म्हणाले.
अल्पसंख्याक समाजातील लोकं मोठ्या प्रमाणावर भारतातून बाहेर गेली होती त्यांना देश स्वतंत्र झाल्यावर परत यायचं आहे असेही शरद पवार म्हणाले.

NRC, CAA यामुळे मुस्लिम समाजाला नजरअंदाज केलं जात आहे. तर दुसरीकडे
व्हिजेेएनटीचे जे लोक आहेत ते कामानिमित्त एका जाग्यावर रहात नाही. अशा लोकांचे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही सांगावं लागणार आहे. त्यांचा पुरावा द्यावा लागणार आहे ही वेळ या भाजपाने आणली आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.
काही लोक श्रीलंकेमध्ये जन्मलेले आहेत त्यांनाही भारतात यायचं आहे. परंतु आजच्या सरकारने जो कायदा केला आहे त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केलेला नाही असेही शरद पवार म्हणाले.

अल्पसंख्याक विभाग आमच्याकडेच हवा असे मला सांगण्यात आले होते.त्यानुसार नवाब मलिक यांच्यावर या खात्याची जबाबदारी दिली आहे त्यामुळे ते अल्पसंख्याक समाजासाठी काम करतील असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान,महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. व्यवस्थित कसे चालेल हे पाहिले पाहिजे. सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहे. परंतु काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे.त्या गोष्टीकडे लक्ष देवू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी केले.
तर अल्पसंख्याक विभाग आणि समाज मोठ्या प्रमाणात आहे. या युवकांना रोजगार देण्याचे काम आपलं आहे. सत्ता आपल्याकडे आहे. त्यांच्यासाठी काम करायचं आहे असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अल्पसंख्याक सेलच्या बैठकीत व्यक्त केला.

अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक करणं आपली जबाबदारी आहे.अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी नवाबभाई मलिक यांच्यावर विश्वासाने पवारसाहेबांनी टाकली आहे. त्यामुळे आता अधिक प्रभावी काम अल्पसंख्याक सेलचे झाले पाहिजे. शिबीरे घेतली पाहिजेत असेही जयंत पाटील म्हणाले.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन,अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक आदींसह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.Body:समाजा-समाजात फूट पाडणाऱ्या भाजपबद्दल विचार करावा लागणार- शरद पवार
mh-mum-01-ncp-sharadpavar-mitting-7201153

मुंबई ता. २३ :
समाजा-समाजात फूट करण्याचे काम आजची भाजप सरकार करत आहे. या सरकारच्या हातात पुन्हा सत्ता देणं चुकीचं आहे त्यामुळे यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

अल्पसंख्याक सेलची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रदेश कार्यालयात पार पडली.

अल्पसंख्याक समाजाची समस्या आहे. त्यांच्या समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत. सध्या देशात भाजपाची सत्ता आहे. समाजातील सर्व वर्गाला सोबत घेऊन जायचं असतं ही सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी असते. भारतातील सर्व लोकांना अधिकार आहे परंतु त्यांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.
पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंकेचा काही हिस्सा आहे. ज्यामध्ये भारतातील काही लोक रहात आहेत त्यांना आपल्या देशात परत यावं वाटत आहे. त्यांचा तो अधिकार आहे परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना ते मान्य नसल्याचेही शरद पवार म्हणाले.
अल्पसंख्याक समाजातील लोकं मोठ्या प्रमाणावर भारतातून बाहेर गेली होती त्यांना देश स्वतंत्र झाल्यावर परत यायचं आहे असेही शरद पवार म्हणाले.

NRC, CAA यामुळे मुस्लिम समाजाला नजरअंदाज केलं जात आहे. तर दुसरीकडे
व्हिजेेएनटीचे जे लोक आहेत ते कामानिमित्त एका जाग्यावर रहात नाही. अशा लोकांचे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही सांगावं लागणार आहे. त्यांचा पुरावा द्यावा लागणार आहे ही वेळ या भाजपाने आणली आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.
काही लोक श्रीलंकेमध्ये जन्मलेले आहेत त्यांनाही भारतात यायचं आहे. परंतु आजच्या सरकारने जो कायदा केला आहे त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केलेला नाही असेही शरद पवार म्हणाले.

अल्पसंख्याक विभाग आमच्याकडेच हवा असे मला सांगण्यात आले होते.त्यानुसार नवाब मलिक यांच्यावर या खात्याची जबाबदारी दिली आहे त्यामुळे ते अल्पसंख्याक समाजासाठी काम करतील असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान,महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. व्यवस्थित कसे चालेल हे पाहिले पाहिजे. सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहे. परंतु काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे.त्या गोष्टीकडे लक्ष देवू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी केले.
तर अल्पसंख्याक विभाग आणि समाज मोठ्या प्रमाणात आहे. या युवकांना रोजगार देण्याचे काम आपलं आहे. सत्ता आपल्याकडे आहे. त्यांच्यासाठी काम करायचं आहे असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अल्पसंख्याक सेलच्या बैठकीत व्यक्त केला.

अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक करणं आपली जबाबदारी आहे.अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी नवाबभाई मलिक यांच्यावर विश्वासाने पवारसाहेबांनी टाकली आहे. त्यामुळे आता अधिक प्रभावी काम अल्पसंख्याक सेलचे झाले पाहिजे. शिबीरे घेतली पाहिजेत असेही जयंत पाटील म्हणाले.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन,अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक आदींसह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.