ETV Bharat / city

Girl Marriage Age : मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्ष करावे का? यासाठी महाराष्ट्रात चर्चा व्हावी - सुप्रिया सुळे - State Women's Commission Anniversary

मुलींचे लग्नाचे वय 21 वर्ष ( girl marriage Age 21 years ) करावे. हा केंद्र सरकारचा निर्णय माझ्या वैयक्तिक पातळीवर मला चांगला वाटत असला. तरी, हा निर्णय संपूर्ण देशावर परिणाम करणार आहे. त्यामुळे या निर्णय घेण्या आधी सर्वांगीण चर्चा होणे गरजेचे असल्याचेही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ( Supriya Sule Reaction on girl marriage Age ) सांगितले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य महिला आयोगाच्या 39 व्या वर्धापन दिनाच्या दिनानिमित्त कार्यक्रम ( State Womens Commission Anniversary ) झाला, यावेळी त्या बोलत होत्या.

State Womens Commission Anniversary
राज्य महिला आयोग वर्धापन दिन
author img

By

Published : Jan 25, 2022, 5:48 PM IST

मुंबई - मुलीच्या लग्नाचे वय अठरा वर्षावरून 21 वर्ष करण्यात ( girl marriage age 21 years ) यावे यासाठी केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याअगोदर सर्व स्तरावर या बाबतची चर्चा करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ( Union Minister Smriti Irani ) यांच्याकडे आपण केली असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ( Supriya Sule Reaction on girl marriage Age ) सांगितले. त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. तसेच महाराष्ट्रात याबाबत स्वतंत्रपणे चर्चा झाली पाहिजे असं मतही त्यांनी या कार्यक्रमादरम्यान मांडले. मुलींचे लग्नाचे वय 21 वर्ष करावे. हा केंद्र सरकारचा निर्णय माझ्या वैयक्तिक पातळीवर मला चांगला वाटत असला. तरी, हा निर्णय संपूर्ण देशावर परिणाम करणार आहे. त्यामुळे या निर्णय घेण्या आधी सर्वांगीण चर्चा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
  • मुंबईत राज्य महिला आयोगाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम -

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य महिला आयोगाच्या 39 व्या वर्धापन दिनाच्या दिनानिमित्त कार्यक्रम ( State Womens Commission Anniversary ) झाला असून या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह महिला आयोगाचे सदस्य उपस्थित होते.

  • शरद पवार यांची प्रकृती ठणठणीत -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली. मात्र त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. सध्या ते विश्रांती घेत असून, या वेळेमध्ये ते वाचन करत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच महिला आयोगाच्या या कार्यक्रमाला येण्याची शरद पवार यांचा इच्छा होती मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला येता आले नाही याची खंत शरद पवार यांना असल्याची सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 'माझ्या खुर्चीवर अनेकांचा डोळा' - पोलीस महासंचालक

"मी कधीही कोणाच्या खुर्चीवर डोळा ठेवलेला नाही, मात्र माझ्या खुर्चीवर अनेकांचा डोळा" असं मिश्किल वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात केलं. या कार्यक्रमा दरम्यान संजय पांडे भाषण करत असताना त्यांनी चुकून आपण महिला आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष असल्याचे माहित नव्हते, ही चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलीस महासंचालकांनी हे मुश्किल वक्तव्य केले.

  • आठ तास ड्युटी संदर्भाचा लवकरच बैठक - नीलम गोऱ्हे

मुंबईसारख्या शहरात अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी शौचालय नसते अशी खंत खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केली. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी शौचालय बांधण्याचे निर्देश या कार्यक्रमादरम्यानच दिले. तसेच महिला पोलिसांच्या आठ तास ड्युटी संदर्भाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही असे पोलीस महासंचालकांनी सांगितल्यानंतर याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत याबाबत लवकरच बैठक घेऊ असा आश्वासनही नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

  • यशोमती ठाकूर यांचा सरकारला घरचा आहेर - यशोमती ठाकूर

"कोस्टल रोड झाला नाही तरी चालेल, पण मुलांना आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी पैसे राज्य सरकारने दिले पाहिजेत असा टोला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापनादिनानिमित्त केलेल्या भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा - Rupali Chakankar Special Interview with ETV Bharat : 'ती'चं अस्तित्त्व मान्य करणं म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण - रुपाली चाकणकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.