ETV Bharat / city

Mumbai Cruise Drugs Case: यातील ९० टक्के प्रकरणे ही फेक सिद्ध होतील, मोदींनी याची माहिती घ्यावी- नवाब मलिक - नवाब मलिक

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणात आपला निकाल देताना आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आज आर्यनला जामीन मिळेल, अशी अपेक्षा होती, पण एनडीपीएस न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. याबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ncp leader nawab malik
Ncp leader nawab malik
author img

By

Published : Oct 20, 2021, 4:37 PM IST

Updated : Oct 20, 2021, 5:28 PM IST

मुंबई - आज आर्यनला जामीन मिळेल, अशी अपेक्षा होती, पण एनडीपीएस न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. याबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज नाही तर उद्या यातील ९० टक्के प्रकरणे ही खोटी आहेत हे कोर्टामध्ये सिद्ध होणार आहे. मी काही पुरावे गोळा करत आहेत. याच्यातील ९० टक्के प्रकरणी ही कशी तयार करण्यात आली याचे पुरावे आम्ही गोळा करत आहोत.

पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक

माध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, न्यायाधीशांनी जो निर्णय दिला आहे त्याच्यावर माझा कुठलाही आक्षेप नाही. ज्या प्रकारचा युक्तीवाद करण्यात आला आहे त्यावरही मला आक्षेप नाही. एनडीपीएस कोर्टापासून ते हायकोर्टापर्यंत एनडीपीएस कोर्टाच्या वकिलांचा युक्तीवाद प्रत्येक वेळी बदलतो. ते नव नवीन विषय दरवेळी कोर्टात आणतात. काही लोकांना अडकवण्याचा हा नवीन डाव आहे. असेच बरेच डाव आम्ही पाहिले आहेत. आमच्या प्रकरणामध्ये पाच लाखांपर्यत व्हॉट्सअ‍ॅप चॅट दाखवत राहिले. त्याचा उल्लेख चार्जशिटमध्ये नाही. लोकांना जामीन मिळू द्यायचा नाही. माझ्याकडे एक प्रकरण असे आहे ज्यात त्यांनी हा जामीन पात्र गुन्हा आहे असे लिहून दिले आहे. प्रसिद्धीसाठी लोकांना अडकवायचे, जामीन मिळू द्यायचा नाही, याद्वारे दहशत निर्माण करायची, खंडणी वसूल करायची हे या मुंबईमध्ये सुरु आहे,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा - Aryan Khan Bail Rejected : दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला

आज आर्यन खान प्रकरणात जामीन नाकारला आहे. युक्तीवाद झाला आहे त्यावरून निर्णय झाला पाहिजे. आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे असं सांगून जामीन मिळू दिला जात नाही. लोकांना जास्त त्रास कसा द्यायचा आणि जामीन मिळवू द्यायचा नाही. काही लोकांना जामीन मिळू देण्यासाठी प्रयन्त करायचा आणि काहींना जामीन मिळू द्यायचा नाही. जे सर्व काही पुरावे आहेत ते समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील आहे. जर असं असेल तर आरोपीला मदत करण्याची भूमिका असेल. ९० टक्के केसेस फेक आहेत.

नवाब मलिक

पंतप्रधान मोदींनी एनसीबीच्या प्रकरणांची माहिती घ्यावी- मलिक

देशातील केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करू नये तपास यंत्रणांवर विश्वास दाखवत त्यांना बळकटी द्यावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. पंतप्रधानांना केंद्रीय यंत्रणांचं इतकच कौतुक वाटत असेल, तर त्यांनी एनसीबीच्या वर्षभरातील प्रकरणांची माहिती घ्यावी. एन सी बी ने केलेल्या बोगस प्रकरणांची माहिती आणि पुरावे आम्ही देऊ, त्याबाबतही त्यांनी विचार करावा, असा टोला मलिक यांनी लगावला आहे

Last Updated : Oct 20, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.