ETV Bharat / city

Nawab Malik Allegations : केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करूनही सरकार पाडता आले नाही - मलिक - महाविकास आघाडी २ वर्षे

खोट्या बातम्या पेरून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. तपास यंत्रणांचा वापर करूनही २ वर्षात सरकार पाडता आले नाही. मात्र बातें कम, काम ज्यादा, असे सरकारचे धोरण असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काम उत्तम सुरू असल्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Nawab Malik
Nawab Malik
author img

By

Published : Nov 28, 2021, 10:20 AM IST

Updated : Nov 28, 2021, 10:36 AM IST

मुंबई - भाजपाला पत्रकार परिषद घेण्यावाचून पर्याय नाही. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (opposition Leader Devendra Fadnavis) यांना अजूनही वाटत आहे, की आपणच मुख्यमंत्री आहोत. भाजपा आयटी सेल चुकीच्या गोष्टी व्हायरल करत आहेत. मात्र आम्ही त्यांना चारी मुंड्या चीत करू, असे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) म्हणाले.

'बातें कम, काम ज्यादा'

खोट्या बातम्या पेरून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. तपास यंत्रणांचा वापर करूनही २ वर्षात सरकार पाडता आले नाही. मात्र बातें कम, काम ज्यादा, असे सरकारचे धोरण असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काम उत्तम सुरू असल्याचे मलिक म्हणाले आहेत. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'भाजपा विफल'

प्रलोभने दाखवून आमच्यासह आमच्या सहकारी पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना भाजपाने फोडले. ते सर्व परत येतील. मात्र आता भाजपा सत्तेपासून दूर आहेत. विरोधीपक्ष म्हणूनही त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. उत्तर प्रदेशात काम होवो अथवा न होवो, जाहिरातबाजी मात्र महाराष्ट्रात होते, असा आरोप त्यांनी केला.

'कोविडचा अडथळा नाही'

ते म्हणाले, की प्रत्येक नागरिकाला असे वाटले पाहिजे, की सरकार आमच्यासाठी काही करत आहे. कोविड(COVID)काळात सुरक्षा देण्याचे काम सरकारने केले. १५४६ कोटी तरतूद तसेच खर्च कोविड संरक्षणार्थ दिले. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना, विमा आदी सुरक्षा पुरविण्याचे काम केले. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सहाय्य केले.

'संघ भ्रमित'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आता विश्व स्वयंसेवक व्हावे. भाजपाची मातृ-पितृ संघटना लोकांना भ्रमित करण्याचे काम करीत आहे. मात्र ती स्वत:च भ्रमित झाली आहे. किती मुले जन्माला घालावी, लोकसंख्या कमी करायची की वाढवायची हे त्यांनी ठरवावे, असा टोला त्यांनी लगावला.

'स्वत:च्याच मनाची बात करतात'

आपल्या मन की बात (Mann Ki Baat) बंद करून जन की बात करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ स्वत:च्याच मनाची बात करतात, असा आरोप त्यांनी केला आहे.

Last Updated : Nov 28, 2021, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.