ETV Bharat / city

भाजप घाबरल्यानेच नाकारली सोमय्यांना उमेदवारी - नवाब मलिक - नवाब मलिक

भाजपने सोमय्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाजप घाबरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केली.

नवाब मलिक
author img

By

Published : Apr 4, 2019, 9:22 AM IST

मुंबई - भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबई मतदार संघातून उमेदवारी देऊन दाखवावी, असे आव्हान आपण भाजपला चार दिवसांपूर्वी दिले होते. परंतु भाजपने सोमय्याला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाजप घाबरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केली.

भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव होईल, या भीतीने त्यांना उमेदवारी देण्यास भाजने टाळाटाळ केली होती. त्यामुळे भाजपने सोमय्या यांना उमेदवारी देऊन दाखवावी, असे आव्हान नवाब मलिक यांनी चार दिवसांपूर्वी आव्हान दिले होते. भाजपने सोमय्या यांना तिकीट नाकारुन त्यांच्या ठिकाणी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे.

तुमच्या पापाचा घडा भरला आहे -

नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, की तुरुंगात टाकण्याचा खेळ तुम्ही सुरू केला आहे. त्यामुळे तुमच्या पापाचा घडा भरला आहे, अशा शब्दात मलिक यांनी मोदींनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. तुमच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, तुमचा पराभव जनता लवकरच करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

गोंदियाच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. याचा अर्थ मोदींना देशात भाजपचा पराभव होणार आहे, हे दिसू लागले आहे, असा टोलाही मलिक यांनी लगावला. विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी मोदी देत आहेत. त्यांच्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरून जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, शिवसेनेच्या दबावाला बळी पडून भाजपला विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापावा लागला. सोमय्या यांनी सेनेवर टीका केली होती. त्याचप्रमाणे खासदार कपिल पाटील यांनीही अशीच टीका केली होती. त्यावर भाजप असा निर्णय घेईल काय, असा सवालही राष्ट्रवादीकडून करण्यात आला.

सोमय्याला उमेदवारी देण्यासाठी भाजप घाबरली-नवाब मलिक

मुंबई, ता. 3 : भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबई मतदार संघातून उमेदवारी देऊन दाखवावी, असे आव्हान आपण भाजपला चार दिवसांपूर्वी दिले होते, परंतु भाजप सोमय्याला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाजप घाबरली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केली.
मुंबईतील ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव होईल या भीतीने  त्यांना उमेदवारी देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे भाजपाने सोमय्या यांना उमेदवारी देऊन दाखवावी असे आव्हान नवाब मलिक यांनी चार दिवसांपूर्वी आव्हान दिले होते. आज भाजपाने सोमय्या यांना  तिकीट नाकारून त्यांच्या ठिकाणी भाजपचे मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान आज माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा मोदींवर टीका केली. ते म्हणाले की,तुरुंगात टाकण्याचा खेळ तुम्ही सुरू केला आहे, त्यामुळे तुमच्या पापाचा घडा भरला आहे. अशा शब्दात मलिक यांनी मोदींनी केलेल्या टिकेला सडेतोड उत्तर देत तुमच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, तुमचा पराभव जनता लवकरच करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
गोंदियाच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. याचा अर्थ मोदींना देशात भाजपचा पराभव होणार आहे हे दिसू लागले आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी मोदी देत आहेत. त्यांच्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरून जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, शिवसेनेच्या दबावाला बळी पडून भाजपला विद्यमान खासदार किरीट सोमैय्या यांचा पत्ता कापावा लागला. सोमय्या यांनी सेनेवर टीका केली होती. त्याच प्रमाणे खासदार कपिल पाटील यांनीही अशीच टीका केली होती, त्यावर भाजप असा निर्णय घेईल काय असा सवालही राष्ट्रवादीकडून करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.