ETV Bharat / city

Eknath Khadase On BJP : राज्यपालांचे वागणे अनाकलनीय, सुडाचे राजकारण सुरू - एकनाथ खडसे - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

गेली 40 वर्षे आपण राजकारणात काम करीत आहोत मात्र अलीकडच्या काळात सुरू असलेले सुडाचे राजकारण यापूर्वी कधी पाहिले नव्हते अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadase ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

Eknath Khadase On BJP
एकनाथ खडसे
author img

By

Published : Jul 8, 2022, 4:51 PM IST

मुंबई - गेली चाळीस वर्षे आपण राजकारणात आहोत. यापैकी जवळपास 35 वर्षे आपण भारतीय जनता पक्षात काम केले मात्र त्या काळात अनुभवलेली वचनबद्धता अलीकडे दिसत नाही. राजकारण केवळ सूडबुद्धीने सुरू आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना केवळ सूडबुद्धीचे राजकारण करून चालत नाही राजकारणात मैत्री आणि संबंध जपावे लागतात अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadase ) यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे यांच्यासोबत प्रतिनिधीने साधलेला संवाद

राज्यपालांचे वागणे अनाकलनीय - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अनाकलनीय रित्या वागत आहेत. गेले दीड वर्ष त्यांनी महाविकास आघाडीची बारा आमदारांची यादी रोखून ठेवली आहे. त्यात त्यांनी योग्य प्रतिनिधी नसल्याचे कारण दिले आहे. आता काही दिवसातच ते नक्कीच 12 आमदार निवडतील. हे बारा आमदार खरोखर योग्य प्रतिनिधी आहेत का? हे आम्ही नक्की पाहू. त्याशिवाय विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रकरणात राज्यपालांनी सांगितले की, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निवड करता येणार नाही. मग एका रात्रीत असा काय चमत्कार झाला की त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास परवानगी दिली, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला आहे.

विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करणार - विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा नाही. संख्याबळाच्या नियमानुसार शिवसेनेकडे अधिक संख्यावर असल्याने त्यांचाच विरोधी पक्षनेता होईल. मात्र विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आपण जनतेच्या प्रश्नांना अधिक अधिक वाचा फोडण्याचे काम सभागृहात करून असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Bakri Eid Special : पुण्याच्या लक्ष्मी बाजारात रॅम्बो बकऱ्याची चर्चा...पहा पुण्यातील रॅम्बो बकरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.