ETV Bharat / city

Vedanta Foxconn Agitation वेदांत, फॉक्सकॉन समूह गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे मुंबईत जोरदार आंदोलन - राज्य सरकार

Vedanta Foxconn Agitation वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta Foxconn project ) गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात टीकेची ( Eknath Shinde Govt ) जोड उठवली आहे.

Vedanta Foxconn Agitation
Vedanta Foxconn Agitation
author img

By

Published : Sep 15, 2022, 4:06 PM IST

मुंबई वेदांता ग्रुप आणि फॉक्सकाँन समूहाने गुजरातमध्ये प्रकल्प तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यात जवळपास 1 लाख 68 कोटीची गुंतवणूक आता गुजरातमध्ये होणार आहे. यासोबतच जवळपास एक लाखाहून अधिक राज्यामध्ये होणारी रोजगार निर्मिती आता गुजरातमध्ये होणारे आहे. ( Agitation against Shinde Fadnavis government ) हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीका होत असून, खास करून विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरल आहे. वेदांता ग्रुपचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार होतं. मंत्रालयावर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून जाहीर केल्यानंतर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन ताब्यात घेऊन त्यानंतर सोडण्यात आले आहे.

राज्य सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न वेदांता ग्रुप आणि फॉक्सकाँन समूह गुजरातला गेल्याने सामान्य जनतेमध्ये आक्रोश आहे. सामान्य जनतेचा आवाज आम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ( Investment in Gujarat due to political pressure) मात्र राज्य सरकारने आम्हाला आंदोलन करू दिले नाही. आंदोलन करण्याआधीच आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी राज्य सरकारवर केला आहे.

राष्ट्रवादीचे मुंबईत जोरदार आंदोलन

अजित पवारांचा आरोप - महाविकासआघाडी सरकारच्या काळात अनेक प्रोजेक्ट राज्यात येणार होते. वेदांता (vedanta project) कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेशमध्ये पाहणी केली होती. त्यानंतर 100 गोष्टींचा, अटींचा विचार करून महाराष्ट्र अंतिम केलं होतं. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सुद्धा तळेगाव दाभाडे हीच योग्य जागा सांगितली होती. मात्र, ही गुंतवणूक राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये ( Investment in Gujarat due to political pressure ) गेली असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांनी केलाय. अशी गुंतवणूक राज्यातून जाणं योग्य नाही. 2 लाख लोकांचा रोजगार गेला. 2 लाख कोटींची गुंतवणूक गेली. हे योग्य नाही असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरात यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल - काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शिंदे सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल ( Congress Balasaheb Thorat Critisize ) केला आहे. स्पर्धेत नसलेल्या गुजरातला हा प्रकल्प देऊन राज्य सरकार ( Eknath Shinde Govt ) गुजरात सरकारचं मन सांभाळत आहे. मात्र महाराष्ट्रातील तरुणांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे, असा घणाघात बाळासाहेब थोरात ( Congress leader Balasaheb Thorat ) यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.