ETV Bharat / city

Aryan Khan Drug Case : प्रभाकर साईलची एनसीबीकडून तीन तास चौकशी - प्रभाकर साईल चौकशी

आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबीच्या SIT कडून प्रभाकर साईलची तीन तास चौकशी करण्यात आली आहे. सोमवारी प्रभाकरची 10 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. मंगळवारीही दक्षता पथकाने प्रभाकरवर प्रश्नांचा भडिमार केला.

file photo
फाईल फोटो
author img

By

Published : Nov 11, 2021, 9:03 PM IST

Updated : Nov 11, 2021, 9:37 PM IST

मुंबई - आर्यन खान ड्रग(Aryan Khan Drug Case) प्रकरणात एनसीबीच्या SIT कडून प्रभाकर साईलची(Prabhakar Sail) तीन तास चौकशी करण्यात आली आहे. पुन्हा चौकशीला बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आर्यन खान ड्रग प्रकरणात प्रभाकर साईल हा पंच होता. 25 कोटींच्या डील प्रकरणी अनेक खुलासे साईलने उघड केले होते.

हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : साईलचे वकील म्हणाले...

  • याआधीही झाली होती साईलची चौकशी -

सोमवारी प्रभाकरची 10 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. मंगळवारीही दक्षता पथकाने प्रभाकरवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यानंतर आज पुन्हा प्रभाकर साईलची एनसीबीच्या एसआयटीने तीन तास चौकशी केली आहे.

  • प्रभाकर साईलने दिली होती धक्कादायक माहिती -

एनसीबीच्या एसआयटीने आज पुन्हा प्रभाकर साईलची चौकशी केली आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या सुटकेच्या बदल्यात 25 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. या डीलमधून मिळालेले आठ कोटी रुपये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना देण्यात येतील, असे गोसावी यांनी सांगितल्याचा दावा साईलने केला होता. प्रभाकर साईलच्या या आरोपांनंतर एनसीबीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, समीर वानखेडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

हेही वाचा - Aryan khan drugs case : एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंगयांनी प्रभाकर साईलचा नोंदवला जबाब

Last Updated : Nov 11, 2021, 9:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.