मुंबई - मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर शनिवारी रात्री एनसीबीने छापा टाकला. यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यत अकरा जणांना अटक झाली आहे. आर्यन खानला न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने कॉर्डींया द क्रूझवर केलेल्या चौकशीनंतर क्रूझचा सीईओला चौकशीसाठी आज दुसरे समन्स बजावण्यात आले आहे.
हेही वाचा - Cruise Drug Case : एनसीबी कारवाईपूर्वीचे क्रुझ ड्रग्स पार्टीचे व्हायरल व्हिडिओ
- कॉर्डींया द क्रूझची एनसीबीकडून सखोल चौकशी-
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डींया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. त्यानंतर, रविवारी आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना काला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकरणात एनसीबीने पुन्हा काल कॉर्डींया द क्रूझवर छापा टाकला होता. क्रूझवरून ताब्यात घेतलेल्या 8 जणांची चौकशी केल्यानंतर एनसीबीने तीन आरोपींना अटक केली आहे. सोमवारी केलेल्या कारवाईत आणखी काही जण क्रूझवर ड्रग्स घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एनसीबीने कॉर्डींया द क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम यांना पुन्हा समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. या चौकशीत आणखी नवीन खुलासे होण्याची शक्यत आहे.
- पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला -
मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डींया द क्रूझवर संबंधित अधिकाऱ्यांकडून ज्या दिवशी छापा टाकला, त्या दिवशीचा मेनिफेस्टो मागवला आहे. यातून क्रूझवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील, रूम नंबर, त्यांच्या आय-कार्डचा तपशील, मोबाईल क्रमांकासह इतरही माहिती उपलब्ध होईल. क्रूझचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आले आहेत. याशिवाय या क्रूझवर ड्रग्ज डीलर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे कॉर्डींया द क्रूझवर 2 ऑक्टोबर झालेल्या पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला आहे. याशिवाय क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम यांना पुन्हा समन बजावत चौकशीसाठी बोलावले आहे.
हेही वाचा - ड्रग्स पार्टी प्रकरण : कॉर्डिलीया क्रुझ टर्मिनल गेट समोरून 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा