ETV Bharat / city

क्रुझ ड्रग्ज प्रकरणाची आजपासून NCB एसआयटीच्या 'स्पेशल 20'कडून चौकशी, आर्यनच्या अडचणी वाढणार? - Mumbai cruise drugs case

आर्यन खान ड्रग्ज केस आणि समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी दोन विशेष तपास पथक (एसआयटी) करणार आहेत.

NCB SIT's Special 20 action in Mumbai drug case will start from today, will Aryan's difficulty increase?
आजपासून मुंबई ड्रग प्रकरणाच्या NCB एसआयटीच्या स्पेशल 20 ची कारवाई सुरू होणार, आर्यनचा अडचणीत वाढणार?
author img

By

Published : Nov 8, 2021, 10:19 AM IST

Updated : Nov 8, 2021, 10:28 AM IST

मुंबई - कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्याकरिता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) दोन विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहेत. ही दोन्ही पथके सोमवारपासून अॅक्शन मोडमध्ये असणार आहेत. आर्यन खान ड्रग्ज केस आणि समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी ही पथके करणार आहेत. या दोन्ही पथकांमध्ये एकूण 20 सदस्य आहेत. त्यापैकी आर्यन खान प्रकरणासह इतर सहा प्रकरणांचा तपास 13 अधिकारी करणार आहेत. तर दुसऱ्या पथकात सात अधिकारी असतील आणि ते एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी करणार आहेत.

संजय सिंह आज मुंबईत -

आर्यन खान प्रकरणासह इतर पाच प्रकरणांचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या एसआयटीमध्ये एकूण 13 जण आहेत. यांचे नेतृत्व डायरेक्टर जनरल संजय सिंह करणार आहेत. संजय सिंह हे आज (सोमवार) सकाळी दिल्ली विमानतळावरुन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यांच्या पथकामध्ये एक ॲडिशनल डायरेक्टर, दोन एसपी, आणि इतर 10 अधिकारी असणार आहे. हे पथक आर्यन खान प्रकरणासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांचे जवाई समीर खान यांच्या प्रकरणाची देखील चौकशी करणार आहे.

आर्यन खान प्रकरणामध्ये आतापर्यंत ज्या कुणाचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. त्या सर्वांचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या प्रकरणातील पंचांचा देखील जबाब एसआयटी घेणार आहे. ज्या प्रमाणात या प्रकरणात मुंबई एनसीबीवर आरोप करण्यात आले, त्या आरोपांची चौकशी या स्पेशल एसआयटी मार्फत करण्यात येणार आहे. आर्यन खान प्रकरणासह समीर खान यांच्या प्रकरणाची देखील एसआयटीने काल सर्व कागदपत्र आपल्या ताब्यात घेतले आहेत. सर्व कागदपत्राची पाहणी एसआयटीकडून सुरू आहे. मात्र तरी उद्या खऱ्या अर्थाने एसआयटी आपल्या तपासाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय नवीन वळण येते हे पाहावे लागणार आहे.

सात सदस्य करणार वानखेडेंवरील आरोपांची चौकशी -

आर्यन खान प्रकरणामध्ये पंच असलेले प्रभाकर साईल यांनी आर्यन खानला या प्रकरणातून सोडविण्याकरिता आर्यनेचे पिता आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान कडून 25 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या प्रकरणात मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे देखील नाव आले होते. या खंडणी प्रकरणाची चौकशी करण्याकरिता दिल्ली व्हिजिलेन्स मुंबईत येऊन चौकशी करून गेले होते. आता ही टीम पुन्हा मुंबईत येणार असून या प्रकरणातील प्रमुख पंच प्रभाकर साईल, किरण गोसावी, मनिष भानुशाली, सॅम डिसूजा, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी या सर्वांचा जबाब नोंदवणार आहे. तसेच या प्रकरणात 12 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले होते, या सर्वांचे जबाब बराबर आहे की नाही यासंदर्भात देखील एसआयटी तपास करणार आहे.

एसआयटीमध्ये विविध राज्यांचे अधिकारी -

आर्यन खान प्रकरणानंतर ज्याप्रमाणे एनसीबीवर आणि त्यांच्या कार्यवाहीवर रोज नव-नवीन आरोप होत आहे. या आरोपांची चौकशी करण्याकरिता एनसीबीकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या एसआयटीमध्ये देशातील विविध राज्यातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून या प्रकरणाच्या तपासातील सत्य समोर यावे. यासाठी विविध राज्यातील अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एसआयटीकडून आर्यन खानसह इतर लोकांना समन्स -

आर्यन खान सह इतर पाच प्रकरणांचा तपास करणाऱ्या एसआयटीने काल (रविवार) आर्यनला समन्स जारी केला आहे. त्यामध्ये आर्यन खान, समीर खान, अरबाज मर्चंट, यांना एसआयटीने समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - वानखेडेंच्या चौकशीसाठी दोन एसआयटीची स्थापना; नवाब मलिक यांचे ट्विट

Last Updated : Nov 8, 2021, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.