ETV Bharat / city

आर्यन खान प्रकरणी NCB SIT टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतली मुंबई कमिशनर यांची भेट - एनसीबी एसायटी चे प्रमुख ज्ञानेश्वर सिंग

आर्यन खान प्रकरणी NCB SIT टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंग यांनी मुंबई कमिशनर यांची भेट घेतली. मुंबई कमिशनर ऑफीस येथे जाऊन ज्ञानेश्वर सिंग यांनी भेट घेतली. पूजा ददलानी आणि प्रभाकर साईल भेटीचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी या भेटीत त्यांनी केली.

NCB SIT team chief Dnyaneshwar Singh
NCB SIT team chief Dnyaneshwar Singh
author img

By

Published : Nov 9, 2021, 4:14 PM IST

Updated : Nov 9, 2021, 4:53 PM IST

मुंबई - आर्यन खान प्रकरणी NCB SIT टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंग यांनी मुंबई कमिशनर यांची भेट घेतली. मुंबई कमिशनर ऑफीस येथे जाऊन ज्ञानेश्वर सिंग यांनी भेट घेतली. पूजा ददलानी आणि प्रभाकर साईल भेटीचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी या भेटीत त्यांनी केली.

ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच प्रभाकर साईल यांची आज एनसीबी कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार आहे. साईल जबाब नोंदवण्यासाठी प्रभाकर साईल एनसीबी कार्यालयात दाखल झालेत. साईल यांची काल १० तास चौकशी झाली होती. एनसीबीनं त्यांना आज पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 6 प्रकरणांची चौकशी एनसीबीचं एसआयटी पथक करणार आहे.

आर्यन खानसह 6 प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीचं पथक दिल्लीहून मुंबईला पोहोचलं आहे. या पथकात 13 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाचं नेतृत्व संजय सिंह करत आहेत. दुसरीकडे एनसीबी अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांची चौकशी करण्यासाठीही एक पथक मुंबईत दाखल झालं आहे. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी समीन वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. एनसीबीचं आणखी एक पथक याच प्रकरणी आपला तपास पुढे सुरु करणार आहे.

Last Updated : Nov 9, 2021, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.