ETV Bharat / city

विलेपार्ले येथे एनसीबीकडून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, संशयित आरोपी फरार - mumbai crime news

एनसीबीच्या पथकाला विलेपार्ले येथील गोपनीय सूत्रांकडून अमली पदार्थाशी संबंधित माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आज (मंगळवारी) एनसीबीच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

Ncb
Ncb
author img

By

Published : Nov 2, 2021, 7:28 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवारी विलेपार्ले येथे छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी छापा टाकल्याचे समजताच संशयित आरोपी पळून गेले. एनसीबीचे अधिकारी आरोपीचा कसून शोध घेत आहेत. एनसीबीने छापेमारीबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

एनसीबीच्या पथकाला विलेपार्ले येथील गोपनीय सूत्रांकडून अमली पदार्थाशी संबंधित माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आज (मंगळवारी) एनसीबीच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. छापा टाकण्यापूर्वीच अमली पदार्थ तस्कर घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र, एनसीबीच्या पथकाने येथून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. एनसीबीच्या पथकाची कारवाई अजूनही सुरूच आहे.

हेही वाचा - उत्तर महाराष्ट्रातील गारपीट ग्रस्तांसाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर; वाचा, कोणत्या जिल्ह्याला किती निधी ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.