ETV Bharat / city

मुंबईत एनसीबीची छापेमारी, 4 अमलीपदार्थ तस्करांना अटक - mumbai breaking news

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून मुंबईत कारवाई करण्यात आली. मुंबईतील कुर्ला, लोखंडवाला, वर्सोवा डोंबिवली व वाशी परिसरामधील काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

मुंबईत एनसीबीची छापेमारी
मुंबईत एनसीबीची छापेमारी
author img

By

Published : Jan 2, 2021, 4:16 PM IST

मुंबई- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून मुंबईत कारवाई करण्यात आली. मुंबईतील कुर्ला , लोखंडवाला , वर्सोवा डोंबिवली व वाशी परिसरामधील काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या दरम्यान 4 अमलीपदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 100 ग्राम एमडी जप्त करण्यात आलेले आहे.

या कारवाईदरम्यान एनसीबी कडून अन्वर शेख उर्फ करीम लाला, या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. मुंबईमध्ये या अमली पदार्थाच्या तस्करांचे 50 ते 60 जणांचे नेटवर्क सध्या काम करत आहे. त्यामुळे एनसीबीकडून कारवाई केली जात आहे.

मुंबईत एनसीबीची छापेमारी
एएनसीने सुद्धा केली आहे कारवाई-31 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतील सांताक्रुझ वाकोला परिसरामध्ये रात्री एका अफ्रिकन वंशाच्या नागरिकाला अटक केली. यावेळी त्याच्याकडून 450 ग्राम कोकेन हस्तगत केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या कोकेनची किंमत 51 लाख रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून हा अमली पदार्थ तस्कर मुंबईतील वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊन अमली पदार्थांची विक्री करत होता. असे पोलीस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा- पाकिस्तानकडून राजौरी सेक्टमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.