मुंबई - क्रूझ ड्रग केस प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आर्यनचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम आता अजून वाढला आहे. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालाय दाखल करणार असल्याची माहिती आर्यन खानचे वकील अली काशीद देशमुख यांनी दिली आहे. मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट या दोघांचाही जामीन नामंजूर झाला आहे. यामुळे या तिघांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते.
- एनसीबीकडून Whats App चॅट कोर्टात सादर -
आर्यन खान याचे Whats App चॅट कोर्टात सादर केल्याची माहिती एनसीबीने दिली. पोलिसांना आर्यन खान याच्या व्हाँट्सअप चॅटमध्ये कथीतरित्या ड्रग्जशी संबंधीत काही पुरावे सापडले आहेत. तो एका अभिनेत्रीशी बोलताना हे चॅट झाले असल्याचा एनसीबीचा दावा आहे.
आर्यन खानला क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून सध्या तो जेलमध्ये आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान एनसीबीने जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे. एनसीबीने हे संभाषण कोर्टात सादर केलं आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने कोर्टात ही माहिती दिली आहे. या अभिनेत्री आणि आर्यन खानमध्ये अनेकदा ड्रग्जवरुन चॅटिंग झालं आहे. याआधी एनसीबीने आर्यन खानचं काही ड्रग्ज तस्करांसोबत संभाषण झाल्याचे पुरावे दिले होते.
हेही वाचा - सर्व आरोपींप्रमाणेच आर्यन खानचेही समुपदेशन - समीर वानखेडे
एनसीबीने आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासलं असून याआधीही अनेक संभाषणांचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केलं होतं असं समोर आलं आहे. २ ऑक्टोबरला झालेल्या क्रूझ पार्टीतल्या ड्रग्जसंबंधी दोघांमध्ये बोलणं झालं होतं. याच पार्टीनंतर आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत नंतर अटकेची कारवाई केली होती. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. आज याप्रकरणी सुनावणी होऊन आर्यनसह दोन जणांचा जामीन नाकारण्यात आला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट यांच्यासहित एकूण सहा जणांना एनसीबीने २ ऑक्टोबरला छापा टाकून ताब्यात घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती.
- कोण आहे आर्यन खान
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह इतर सात जणांना एनसीबीने अटक केली. आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट, मून मून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना यांचा समावेश.Body:
- पार्टीची माहिती नव्हती -
प्रतिक गाबा नावाच्या मित्राने फोनवरुन पार्टीची माहिती दिली. अतिमहत्वाच्या व्यक्तींना निमंत्रण येईल म्हणून, असे सांगितले होते. प्रतीक गाबा हा त्यानंतर फर्निचरवालासोबत संपर्कात होता. फर्निचरवाला योजकांच्या कायम संपर्कात होता. पार्टीत ग्लॅमर तडाका टाकावा, या निमित्ताने कदाचित मला पार्टीचं निमंत्रण दिले असावे. परंतु, त्याच्या कोणत्याही हालचालींची मला कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण आर्यन खान यांच्या वकीलांनी न्यायालयात दिले होते.
- कधी झाली अटक?
२ ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले. पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड त्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती. सुरुवातीला आर्यन सह दोघांना तर उर्वरित पाच आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक केली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. जामीन अर्जावर वादी - प्रति वाद्यांकडून जोरदार युक्तिवाद चालला. कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळून सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
-
Drugs on cruise ship case | Mumbai’s Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha pic.twitter.com/Zww2mANkUB
— ANI (@ANI) October 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Drugs on cruise ship case | Mumbai’s Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha pic.twitter.com/Zww2mANkUB
— ANI (@ANI) October 20, 2021Drugs on cruise ship case | Mumbai’s Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha pic.twitter.com/Zww2mANkUB
— ANI (@ANI) October 20, 2021
- जामीन का नाकारला -
कार्डेलिया क्रूझवर टाकलेल्या छापेमारीत ड्रग्स आढळून आले. ड्रग्स प्रकरण थेट परदेशातील ड्रग्स टोळींशी निघडीत असू शकते. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तसेच सुपरस्टार शाहरुख खानचा त्यात आर्यन खान मुलगा आहे. अटकेत असलेली मुले महाविद्यालयीन असल्याने तरुणांवर याचा वाईट परिणाम होईल. देशाचे भविष्य या पिढीवर अवलंबून असल्याचे सांगत, जामीन नाकारण्यात आला आहे. शाहरुख खान याने आर्यन खानचे बाजू मांडणारे वकील सतीश माने - शिंदे यांना बदलण्यात आले. आता अमित देसाई आर्यन खानची बाजू न्यायालयात मांडणार आहेत.
- आर्यन खान कैदी नंबर-956 -
ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या कैदी नंबर N956 आर्यन खानला आर्थर रोड येथील तुरूंगात ठेवले आहे. 20 ऑक्टोबर पर्यंत कोठडीची मुदत असून त्यावर सुनावणी होणार आहे. अरबाज मर्जेंटसह इतर आरोपींना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बरॅक नंबर एकमध्ये सुरुवातीला ठेवले होते. बरॅक नंबर एक हा कोरोना काळात आयसोलेशन वॉर्ड म्हणून तयार केला होता. सर्व आरोपींची कोरोना चाचणी यावेळी निगेटिव्ह आली होती.
- बॉलीवूड कलाकारांचा पाठिंबा -
आर्यन खानला अटक केल्यानंतर सुपरस्टार शाहरुख खान याला बॉलिवूडमधील काही कलाकारांनी पाठींबा दिला. प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट, अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ति, सलमान खान, सुनील शेट्टी प्रत्यक्ष भेट घेत पाठिंबा दिला. सोशल मिडीयातून त्यांनी अटकेविरोधात भावना व्यक्त केल्या.
- नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर आरोप -
मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली क्रुझवर कारवाई झाली. सर्व आरोपींना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पडकल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. एनसीबीची कारवाई बेकायदीश असल्याचा मलिक यांनी दावा करताना, फोटो आणि व्हिडीओ प्रसार माध्यमांसमोर जाहीर केले. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अटक करून ओढत नेणाऱ्या लोकांमध्ये जे. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली या भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे मलिक म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार अशा नेत्यांसोबत फोटोही प्रसार माध्यांमध्ये जाहीर केले होते. तसेच हे लोक एनसीबीच्या छापेमारीत कसे?, एनसीबीशी त्यांचा संबंध काय, असे सवाल उपस्थित केला होता.
- एनसीबीचा खुलासा -
एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा करताना, एनसीबीची कारवाई कायदेशीर होती. त्यानुसारच स्वतंत्र साक्षीदारांना बरोबर नेण्यात आल्याचा दावा केला. भाजपनेही कारवाईची प्रसंशा करत राष्ट्रवादीवर टीका केली होती.