मुंबई - अंमली पदार्थविरोधी कारवाया करणाऱ्या यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक होणार आहे. एनसीबीच्या मुंबई कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीला, एनसीबी (NCB), कस्टम विभाग, एफडीए, आरपीएफ आणि डीआरआयचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.यासंदर्भातील माहिती एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी दिली. गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी सांगितले. सुरुवातीला ही बैठक प्रादेशिक स्तरावर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर ही बैठक होईल. यासाठी विविध यंत्रणांना बोलावण्यात आले आहे. सर्व मिळून ड्रग्जच्या संकटाला कसे तोंड देता येईल याचा विचार केला जाईल, असेही जैन यांनी सांगितलं. तसंच, या बैठकीला सरकारी विभाग, ईडी, शैक्षणिक विभाग, एनजीओ, इंडस्ट्रीच्या लोकांना देखील बोलावलं आहे.
ही बैठक महत्वाची
दरम्यान, अंमली पदार्थविरोधी यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची होणारी बैठक महत्त्वाची मानली जात आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडत आहेत. अदानी यांच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेलं ३ हजार किलोंचे ड्रग्ज किंवा मुंबईच्या एनसीबी विभागाने क्रूझ पार्टीवर टाकलेले छापे या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असणार आहे.
हेही वाचा - कोण आहेत दबंग अधिकारी समीर वानखेडे? जाणून घ्या ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट