ETV Bharat / city

क्रूझवरील कारवाईपासून ते एक दिवसीय NCB कोठडीपर्यंत; वाचा सविस्तर, ड्रग्ज प्रकरण एका क्लिकवर...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासहित तिघांना एनसीबीने अटक केली. क्रुझवर सोबत ड्रग्ज घेतल्याची तिघांनीही कबूल दिली होती. मात्र, तिघांचाही मेडिकल रिपोर्ट अद्याप आलेले नाही. ड्रग्जसोबत ठेवल्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली.  किला न्यायालयात या प्रकरणावर सुनवणी झाली. यावेळी न्यायालयाने आर्यन खानसह तिघांना 1 दिवसीय NCBची कोठडी सुनावली. उद्या (सोमवारी) पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

NCB arrests two including Aryan Khan; Shah Rukh Khan's son's case will be fought by Adv. Satish Mane-Shinde
आर्यन खानसह दोघांना एनसीबीकडून अटक; शाहरुख खानचा मुलाची केस लढणार अॅड. सतीश माने-शिंदे
author img

By

Published : Oct 3, 2021, 6:09 PM IST

Updated : Oct 3, 2021, 11:00 PM IST

मुंबई - एनसीबीकडून (NCB) आज (रविवार) मुंबईत करण्यात आलेल्या मोठ्या ड्रग्ज कारवाईत 8 जणांना ताब्यात घेतले होते. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा याच्यासहित तिघांना एनसीबीने अटक केली. क्रुझवर सोबत ड्रग्ज घेतल्याची तिघांनीही कबूल दिली होती. मात्र, तिघांचाही मेडिकल रिपोर्ट अद्याप आलेले नाही. ड्रग्जसोबत ठेवल्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली. किला न्यायालयात या प्रकरणावर सुनवणी झाली. यावेळी न्यायालयाने आर्यन खानसह तिघांना 1 दिवसीय NCBची कोठडी सुनावली. उद्या (सोमवारी) पुन्हा या प्रकरणावर सुनवाई होण्याची शक्यता आहे.

तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी -

क्रूजवरील पार्टी प्रकरणी ताब्यात घेतलेल्यांपैकी ४ जणांना मेडिकल टेस्टसाठी जे. जे. रुग्णालयात नेल्यानंतर किला कोर्टात हजर केले आहे. आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने आधीच अटक केली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे स्वतः या प्रकरणात मुख्य भूमिका बजावत आहेत. मेडिकल तपासणीनंतर त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आले आहे. दरम्यान आर्यन खानसह तिघांना 1 दिवसाची एनसीबी कोठडी मिळाली आहे. याच दरम्यान त्यांच्या मोबाइलचीदेखील तपासणी केली जाणार आहे.

रिया चक्रवर्तीची केस लढवणारे अॅड. माने-शिंदे लढविली केस -

शाहरुख खानचा मुलाची केस अॅड. सतीश माने-शिंदे यांनी लढवली आहेत. रिया चक्रवर्तीच्या प्रकरणाची केसही अॅड. माने-शिंदे यांनीच लढवली होती.

काय आहे नेमके प्रकरण?

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. दरम्यान, एनसीबीने पार्टीच्या आयोजकांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवासी बनून शिपमध्ये प्रवास केला आणि ही कारवाई केली.

ड्रग्ज नेण्यासाठी केला कपड्याचा वापर -

एनसीबीच्या मुंबई अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस क्रूझवर छापा टाकला. या छापेमारीत MDMA/ एक्स्टसी, कोकेन, MD (मेफेड्रोन) आणि चरससारख्या विविध वस्तूंचा साठा जप्त केला. अमली पदार्थांचा इतका मोठा साठा क्रूझवर येण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या कपड्याचा वापर करण्यात आला होता.

ड्रग्ज क्रूझवर कसे पोहचले?

ड्रग्ज नेण्यासाठी लेडीज हॅन्ड बॅग्सच्या हँडलचा वापर करण्यात आल्याचे समोर येत आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या शर्टाची कॉलर, हाताच्या बाह्या, पॅन्टच्या कंबरपट्ट्याजवळील शिलाई उसवून त्यात ड्रग्स लपवून आणण्यात आला होते. तर महिलांच्या हँडबॅगचे हँडल, इनरवेअरचा ड्रग्स आणण्यासाठी वापर केला गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

क्रूझवरील पार्टीत दिल्लीतील तरुणांचा सहभाग -

पोलीस आणि तत्सम यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी समुद्रात क्रूझवर ड्रग्ज पार्टी आयोजित करण्यात आली होती. ड्रग्ज पार्टीसाठी ८० ते ५ लाखापर्यंत एन्ट्री फी आकारण्यात आली होती. क्रूझवर २ हजार पर्यटकांची क्षमता, प्रत्यक्षात १ हजारांपेक्षा कमी जणांनी उपस्थिती होती. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरुन या पार्टीचे निमंत्रण देण्यात आले. ठरावीक जणांना विशेष किट भेट देऊन पार्टीचे निमंत्रण देण्यात आले होते. या पार्टीला दिल्लीतल्या तरुणांचा सहभाग होता. विमानाने मुंबई गाठून ते क्रूझवर पोहचले होते. अरबाज नावाचा व्यक्ती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवर घेऊन आला होता. अरबाजच्या बुटांमधून ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे.

माझ्या नावे अनेकांना बोलाविले, आर्यनचा दावा

सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या नावावर पार्टीत अनेकांना बोलाविण्यात आल्याचा दावा आर्यनने केला आहे. पार्टीत काय होणार आहे याची माहिती त्याला नव्हती असे त्याने म्हटले आहे. दुसरीकडे एनसीबीचे अधिकारी आर्यनचा मोबाइल तपासत आहेत. त्याच्या मोबाइलमधील चॅट्स तपासले जात आहेत.

आर्यन खानसह चौकशी केली जात असल्यांची नावे -

1) मुनमुन धमेचा

2) नुपूर सारिका

3) इस्मित सिंह

4) मोहक जसवाल

5) विक्रांत छोकेर

6) गोमित चोप्रा

7) आर्यन खान

8) अरबाझ मर्चंट

ताब्यात घेतलेल्यांची वैद्यकीय तपासणी

या प्रकरणी ताब्यात घेतलेल्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. वैद्यकीय चाचणीनंतर सर्वांना मुंबईतील किला कोर्टसमोर हजर केले जाईल. यावेळी एनसीबीकडून त्यांच्या रिमांडची मागणी केली जाऊ शकते.

आठ जण ताब्यात - एनसीबी प्रमुख एसएन प्रधान

या प्रकरणी आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एनसीबीचे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी एएनआयशी बोलताना दिली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील छापे टाकले जातील असे ते म्हणाले. आम्ही इनपुट गोळा करत होतो आणि जेव्हा चरस आणि एमडीसारखी औषधे वापरल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही कारवाई केली. आम्ही निष्पक्षपणे वागत आहोत. प्रक्रियेत, जर बॉलिवूड किंवा श्रीमंत लोकांशी काही संबंध उदयास आले, तर ते असू द्या. आम्हाला कायद्याच्या कक्षेत काम करावे लागेल, असेही ते म्हणाले.

मध्यरात्री कारवाई

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाइल ड्रग्स पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात एका बॉलीवूड अभिनेत्याचा मुलाचाही समावेश असल्याचे समजते आहे. दरम्यान, एनसीबीने पार्टीच्या आयोजकांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवासी बनून शिपमध्ये प्रवास केला आणि ही कारवाई केली.

दोन आठवड्यांपूर्वीच मिळाली माहिती

दोन आठवड्यांपूर्वीच एनसीबीला पार्टीची माहिती मिळाल्याचे समोर येत आहे. एनसीबीचे संचालक एस. एन. प्रधान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. क्रूझवरील ड्रग्ज पार्टी बद्दल २ आठवड्यांपूर्वी आम्हाला माहिती मिळाली होती. यामध्ये बॉलिवूड लिंक समोर आली आहे. मात्र कोणीही आणि कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती यामध्ये गुंतलेला असो कारवाई केली जाईल, याबाबत पुढील आणखी माहिती काही दिवस घेतली जाईल. नशामुक्त भारत हे आमचे ध्येय आहे, असे प्रधान म्हणाले.

हेही वाचा - Drugs Party Case : आर्यन खानसह ताब्यात घेतलेल्यांपैकी ४ जणांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी

Last Updated : Oct 3, 2021, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.