ETV Bharat / city

NCBची मुंबईत मोठी कारवाई; ४ कोटींचे हेरॉइन जप्त, एका व्यक्तीला अटक - मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो झोनल युनिटला मुंबईच्या उपनगरातील इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर एका पार्सलमध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमध्ये झडती घेतली असता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांना एका पॅकेटमध्ये 700 ग्रॅम पांढरी पावडर आढळून आली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

NCB arrests Gujarat man over seizure of Rs 4 crore heroin at Mumbai Cargo Complex
मुंबई कार्गो कॉम्प्लेक्समध्ये 4 कोटी हेरॉईन प्रकरणी एका व्यक्तीला अटक
author img

By

Published : Nov 5, 2021, 3:40 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB ने गुरुवारी मुंबई विमानतळाजवळील कार्गो कॉम्प्लेक्समधून 4 कोटी किंमतीचे 700 ग्रॅम हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीला अटक केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो झोनल युनिटला मुंबईच्या उपनगरातील इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर एका पार्सलमध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमध्ये झडती घेतली असता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांना एका पॅकेटमध्ये 700 ग्रॅम पांढरी पावडर आढळून आली. हे हेरॉईन असल्याचा कथित बेकायदेशीर बाजारात अंदाजे 4 कोटी रुपये किंमत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पार्सलचा प्रेषक, वडोदरा येथील रहिवासी कृष्णा मुरारी प्रसाद याला गुरुवारी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कार्यालयात त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले. चौकशीनंतर प्रसादला अटक करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

आर्यन खान प्रकरणानंतर चर्चेत असलेले एनसीबी आता पुन्हा कारवाई करण्यासाठी सक्रीय झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि यांची एनसीबी प्रमुख समीर वानखडे यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता मुंबई एनसीबी पुन्हा आपल्या ॲक्शन मूडमध्ये पहायला मिळत आहे.

काय आहे प्रकरण?

नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. मंगळवारी एनसीबीने मुंबईतील विलेपार्ले येथे मोठी कारवाई करून मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त केली होती. आज पुन्हा एकदा एनसीबीने कार्गो कॉम्प्लेक्सच्या कॉन्फ्रेंस हॉलमध्ये हेरॉईन जप्त केली. वडोदरा येथे मिळणाऱ्या या पार्सलची चौकशी बुधवारी करण्यात आली. आज हे पार्सल चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. या ड्रग्ज कारवाईत आरोपी कृष्णा मुरारी प्रसादला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.