ETV Bharat / city

मुंबईत कोडेन कफ सिरपसह 2 जणांना एनसीबीने केली अटक - codeine cough syrup

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून मुंबई शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात कारवाई केली जात आहे.

author img

By

Published : Feb 9, 2021, 7:55 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून मुंबई शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात कारवाई केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील गजबजलेल्या धारावी परिसरामध्ये बंदी घालण्यात आलेल्या कोडीन कफ सिरपचा तब्बल 23 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात दोन आरोपींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली. सिराज अहमद व मोहम्मद सद्दाम असं आरोपींचे नावे आहेत.

दोघेही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार-

मुंबईतील कुर्ला परिसरातून 3 दिवसांपूर्वी 20 किलो कोडेन कफ सिरपचा साठा जप्त करून 2 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोडेन सिरप औषधाच्या संदर्भातली ही दुसरी कारवाई आहे. 8 फेब्रुवारी रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सिराज अहमद व सद्दाम या दोन आरोपींना अटक केलेली होती.

या दोघांच्या चौकशीमध्ये आढळून आले की हे दोघेही ते 23 किलो कोडेन कफ सिरपचा साठा हा एका ठिकाणी देण्यास जाणार होते. यापूर्वीच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे पोलिस रेकॉर्डवरील असून या अगोदरही या आरोपींवर एनडीपीएसच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा- ब्रिटनच्या मंत्री, दक्षिण आशियाच्या उप उच्चायुक्तांनी घेतला मुंबई महानगरपालिकेचा हेरिटेज वॉक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.