ETV Bharat / city

Anil Deshmukh Health Issue : ऑर्थर रोड जेलमध्ये अनिल देशमुखांवर नवाब मलिकांनी केले प्राथमिक उपचार! - माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये कोसळले

अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांचा मुक्काम ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. शुक्रवारी मध्यरात्री अनिल देशमुख हे बाथरूमला गेले असता तिथे पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. देशमुख बाथरूममध्ये पडल्याची माहिती नवाब मलिक ( Nawab Malik ) यांना माहिती कळताच त्यांनी तत्काळ देशमुखांकडे धाव घेतली. त्यांच्या खांद्यावर प्राथमिक उपचार केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अनिल देशमुख संग्रहित छायाचित्र
अनिल देशमुख संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 4, 2022, 3:25 PM IST

Updated : Apr 4, 2022, 3:35 PM IST

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्यावर आर्थिक फसवणूक प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल ( ED Filed Case ) करण्यात आल्यानंतर 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांचा मुक्काम ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. शुक्रवारी मध्यरात्री अनिल देशमुख हे बाथरूमला गेले असता तिथे पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. देशमुख बाथरूममध्ये पडल्याची माहिती नवाब मलिक ( Nawab Malik ) यांना माहिती कळताच त्यांनी तत्काळ देशमुखांकडे धाव घेतली. त्यांच्या खांद्यावर प्राथमिक उपचार केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रतिक्रिया देताना जेजे रुग्णालय अधीक्षक
राजकीय वर्तुळात चर्चा : अनिल देशमुख यांना शनिवारी जेजे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आज (सोमवारी) त्यांच्या मेडिकल चाचण्या देखील करण्यात येणार आहे. त्यावरून स्पष्ट होणार की अनिल देशमुख यांना कितपत दुखापत झालेली आहे. मात्र देशमुख यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या प्राथमिक उपचाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पक्षापासून त्या मंत्रिमंडळात एक सोबत असलेले मंत्री नवाब मलिक यांनी अनिल देशमुख यांच्या मदतीला धाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

वैद्यकीय चाचणी होणार : जे जे हॉस्पिटलचे अधीक्षक यांच्या माहितीनुसार अनिल देशमुख यांना शनिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार देखील सुरू करण्यात आले आहे. आज अनिल देशमुख यांची चाचणी करण्यात येणार आहे. त्यात स्पष्ट होणार आहे, की अनिल देशमुख यांची दुखापत कितपत आहे आणि किती वेळ यावर उपचार केल्यानंतर बरी होईल, अशी माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.

सीबीआय घेणार होते ताबा : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सीबीआय आज अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमधून ताबा घेणार होते. मात्र अनिल देशमुख यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सीबीआयला आणखी काही वेळ अनिल देशमुख यांचा ताबा मिळवण्यास करीता वाट पाहावी लागणार असल्याचे माहिती मिळत आहे. सीबीआयला ताबा मिळावा याकरिता मागील आठवड्यात सीबीआयने सत्र न्यायालयात अर्ज देखील केला होता.

हेही वाचा - मुंबई बँक फसवणूक प्रकरणी प्रवीण दरेकरांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू

Last Updated : Apr 4, 2022, 3:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.