ETV Bharat / city

नवाब मलिक यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रवक्ते  नवाब मलिक यांची आज(सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत त्यांच्या माध्यमातून पक्षाला उभारण्याचे काम केले जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादीकडून केली जात आहे.

नवाब मलिक
author img

By

Published : Aug 5, 2019, 3:11 PM IST

Updated : Aug 5, 2019, 3:26 PM IST

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची आज(सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. यामुळे मुंबईत त्यांच्या माध्यमातून पक्षाला उभारण्याचे काम केले जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादीकडून केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी 27 जुलै रोजी पक्षाला अंधारात ठेवून अचानकपणे शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून हे पद खाली होते. मात्र या पदावर एखादा तरुण चेहरा यावा यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र विधानसभेची निवडणूक आणि मुंबईतील एकूणच सत्ताधारी पक्षाचे राजकारण लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या खांद्यावर मुंबई अध्यक्ष पदाची धुरा दिली आहे.

मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत नेते आहेत. तसेच ते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. यामुळे पक्षाची भूमिका जाहीरपणे मांडण्यात त्यांना पक्षाने सर्वाधिकार दिले होते. आता त्यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त केल्याने त्यांच्यावरील मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी कमी होण्याची शक्यता असली तरी मुंबईत मात्र राष्ट्रवादीला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Intro:नवाब मलिक याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवडBody:नवाब मलिक याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड

(यासाठी फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. ५:

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती केली असून यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत त्यांच्या माध्यमातून पक्षाला उभारण्याचे काम केले जाईल अशी अपेक्षा राष्ट्रवादीकडून केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी 27 जुलै रोजी पक्षाला अंधारात ठेवून अचानक पणे शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून हे पद खाली होते. मात्र या पदावर एखादा तरुण चेहरा यावा यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र विधानसभेची निवडणूक आणि मुंबईतील एकूणच सत्ताधारी पक्षाचे राजकारण लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या खांद्यावर मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिली आहे.
मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असे नेते समजले जातात. यामुळे पक्षाची भूमिका जाहीरपणे मांडण्यात त्यांना पक्षाने सर्वाधिकार दिले होते. आता त्यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष या पदी नियुक्त केल्याने त्यांच्यावरील मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी कमी होण्याची शक्यता असली तरी मुंबईत मात्र राष्ट्रवादीला मुंबईत चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.Conclusion:
Last Updated : Aug 5, 2019, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.