ETV Bharat / city

Navratri Festival नवरात्रोत्सवाची मुंबईत जय्यत तयारी; देवींच्या मूर्तींना दिला जातोय अखेरचा टच

Navratri Festival २६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवासाठी आता मुंबई नगरी पूर्णपणे सज्ज झाली असून मुंबईतील विविध मूर्ती कारखान्यात देवींच्या विविध रूपातील मुर्त्याना अखेरचा टच देण्याचे काम सुरू आहे. उत्सवासाठी आता एकाच आठवड्याचा कालावधी उरला असून, Navratri Festival 2022 रविवारी मूर्ती कारखान्यात मूर्ती कारागिरांची मूर्तीला अंतिम रूप देण्याची लगबग दिसून आली.

Navratri Festival
Navratri Festival
author img

By

Published : Sep 18, 2022, 8:16 PM IST

Updated : Sep 18, 2022, 8:23 PM IST

मुंबई २६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सासाठी आता मुंबई नगरी पूर्णपणे सज्ज झाली असून मुंबईतील विविध मूर्ती कारखान्यात देवींच्या विविध रूपातील मुर्त्याना अखेरचा टच देण्याचे काम सुरू आहे. उत्सवासाठी आता एकाच आठवड्याचा कालावधी उरला असून, Navratri Festival 2022 रविवारी मूर्ती कारखान्यात मूर्ती कारागिरांची मूर्तीला अंतिम रूप देण्याची लगबग दिसून आली.

देवींच्या विविधरूपी मुर्त्या दहीहंडी व गणेशोत्सव निर्बंधमुकत व धुमधडाक्यात साजरा झाल्यानंतर आता सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. एकीकडे दांडिया, गरबा प्रशिक्षण वर्गांची धूम सुरू झालेली असतानाच मूर्तीकारांनीही विविध रूपांत असणाऱ्या देवीमूर्ती निर्मितीच्या कामाला वेग दिला आहे. मुंबईतील गणेशोत्सवात ज्या पद्धतीने गणरायाच्या उंचच्या उंच विविध रुपांतील मुर्त्या दिसून आल्या आहेत. Navratri Festival 2022 त्याप्रमाणे यंदा देवींच्या ही उंचच्या उंच मुर्त्या आता तयार झाल्या आहेत. या मुर्त्याना अंतिम टच देण्याचे काम सुरू असून मुंबईतील विविध मूर्ती कारखान्यात हे कारागीर व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

देवींच्या मूर्तीवर अखेरचा हात

दिवस- रात्र जोमात काम सुरू गणेशोत्सवानंतर फार कमी अवधीत देवीच्या मूर्ती घडवायची असते. देवी हे स्त्री रुप असल्याने डोळे, चेहरा, हास्य आदी कामे फार बारकाईने करावी लागतात. त्याच बरोबर देवीला नेसावली जाणारी साडी सुद्धा हे विशेष काम असते, अशी माहिती कृष्णा आर्टचे मूर्तीकार अरुण दाते यांनी दिली. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, नारळाच्या काथ्या, Navratri Festival 2022 मजुरी आदींमध्ये वाढ झाल्याने यंदा मूर्तीचे भावही २५ ते ३० टक्क्यांनी वाढले असले, तरी भाविक भावासाठी जास्त ओढाताण करत नसल्याचे कलागंध आर्ट्सचे, मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी सांगितले आहे. तसेच आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून, रंगरंगोटी करण्याचे काम सध्या दिवस- रात्र जोमाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Last Updated : Sep 18, 2022, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.