100 धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही आहोत, बाळासाहेब ठाकरे हे असते तर त्यांनी आमचे स्वागत केले असते. शिवसेनेला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. हनुमान जंयती दिवशी मुख्यमंत्री यांनी हनुमान मंदिरात प्रार्थना केली नाही, त्यांनी हनुमान चालीसा वाचावी. आम्हाला नाव स्मरण करण्यासाठी, हनुमान चालीसा पठण करण्यास कोणीही रोकू शकत नाही. असे राणा दाम्पत्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे, त्या म्हणाल्या की शिवसैनिक हे कायदा व सुव्यवस्था बिघडवू पाहत आहेत.
Hanuman Chalisa Recite At Matoshree LIVE Update : 'राणा दाम्पत्य उद्या नऊ वाजता मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार'
15:04 April 22
शिवसैनिक हे कायदा व सुव्यवस्था बिघडवू पाहतायेत - रवी राणांचा गंभीर आरोप
14:55 April 22
उद्या नऊ वाजता मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार - रवी राणा
उद्या नऊ वाजता सर्व निर्देशाचे पालन करून मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार आहे. आमची भुमिका स्पष्ट आहे.
13:51 April 22
मुंबई पोलिसांची राणा दाम्पत्यांना नोटीस
राणा दाम्पत्यांना खार पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. कलम 149 अंतर्गत राणा दाम्पत्यांना नोटीस दिली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास राणा दाम्पत्यांना जबाबदार धरण्यात येईल अशा आशयाची नोटीस ही आहे. मुंबईतील खार परिसरात राणा दाम्पत्य सध्या निवासस्थानी आहे.
13:13 April 22
Hanuman Chalisa Recite At Matoshree LIVE Update : राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; नंदगिरी अतिथीगृहाबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी
मुंबई - हनुमान चालिसा पठण करण्यावरून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा ( Navneet Rana Ravi Rana recite Hanuman Chalisa ) या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान केले होते. त्यानुसार मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी ते जात आहेत. त्यावरून शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे आव्हान स्वीकारले असून त्याला विरोध करण्यासाठी शिवसैनिक आज मुंबईत विविध ठिकाणी जमा झालेले आहे. आज राणा दाम्पत्य अमरावती वरून मुंबईत दाखल झाले आहे. या कारणासाठी त्यांनी मुंबई विमानतळ शेजारील नंदगिरी अतिथीगृहात बुकिंग केलेले आहे. या कारणास्तव या अतिथीगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवसैनिक राणा दाम्पत्य विरोधात घोषणाबाजी केली आहे. या सर्व बाबींचा नंदगिरी अतिथीगृहाबाहेरून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने आढावा घेतला आहे.