ETV Bharat / city

Navneet Rana Health Problem : नवनीत राणांच्या वकिलाचे भायखळा कारागृह प्रशासनाला पत्र, म्हणाले... - नवनीत राणा वकील जेल प्रशासन पत्र

खासदार नवनीत राणा यांनी स्पाँडिलायसिसची ( Navneet Rana Health Problem ) समस्या आहे. त्यामुळे त्यांचे सिटी स्कॅन ( Navneet Rana CT Scan ) करण्याची आवश्यकता आहे. मात्र, भायखळा कारागृह प्रशासनाकडून ( Navneet Rana In Byculla Jail ) अद्याप हे सिटीस्कॅन करण्यात आले नाही. त्यामुळे नवनीत राणा यांना जर काही झाल्यास या संदर्भातील सर्व जबाबदारी कारागृह प्रशासनाची असणार आहे, असे पत्र नवनीत राणा ( Rizwan Merchant Letter To Jail Administration ) यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी कारागृह प्रशासनाला दिले आहे.

Navneet Rana Health Problem
Navneet Rana Health Problem
author img

By

Published : May 2, 2022, 4:09 PM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा यांनी स्पाँडिलायसिसची ( Navneet Rana Health Problem ) समस्या आहे. जे जे रुग्णालयात नवनीत राणा यांना तपासणी केली असता, त्यावेळी त्यांचे सिटी स्कॅन ( Navneet Rana CT Scan ) करण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरदेखील भायखळा कारागृह प्रशासनाने ( Navneet Rana In Byculla Jail ) अद्याप ही सिटीस्कॅन करण्यात आले नाही. त्यामुळे नवनीत राणा यांना जर काही झाल्यास या संदर्भातील सर्व जबाबदारी कारागृह प्रशासनाची असणार आहे, असे पत्र नवनीत राणा ( Rizwan Merchant Letter To Jail Administration ) यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी कारागृह प्रशासनाला दिले आहे.

पत्रात नेमकं काय म्हटले आहे? - नवनीत राणा यांच्या वकिलांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र पाठवून तक्रार केली आहे. नवनीत राणा यांना स्पाँडिलायसिसची समस्या आहे. जेलमध्ये सतत फरशीवर बसल्याने आणि झोपल्यामुळे ही समस्या वाढत आहे. यामुळे नवनीत राणा यांना 27 एप्रिल रोजी जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. जेजेमधील डॉक्टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितले होते. मात्र, ते अजून झालेले नाही. त्यांना गंभीर दुखण्याने ग्रासले आहे. सिटीस्कॅन न केल्याने उपचार काय करायचा, हे ठरू शकत नाही. आम्ही संबंधित यंत्रणेला अर्ज दिला आहे. मात्र, त्यावर विचार केला गेला नाही, तर त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याला जबाबदार कारागृह प्रशासन असेल, असे पत्रात म्हटले आहे. तसेच या पत्राची एक प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे काढण्यात यावे, अन्यथा 3 मे पासून मशीदीसमोर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) सुरू करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राजकारण करायचे असल्याची टीका राजकीय नेत्यांनी सुरू केली. संजय राऊत, शरद पवार यांनीही याप्रकरणी राज ठाकरेंच्या या भूमीकेवर जहरी टीका केली. महाविकास आघाडी, मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी 16 एप्रिलला या वादात उडी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदावर आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली ( Ravi Rana Criticized CM Thackeray ) आहे. महाराष्ट्राची ही साडेसाती दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी 'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) करावे, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी राणांच्या घरी हनुमान चालीसा पठण केले. यावर राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री' बाहेर आपण 23 तारखेला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जात असल्याची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटले. राणा दाम्पत्याला अमरावतीतच अडवण्याचा प्रयत्न होणार होता, त्यामुळे त्यांनी गनिमीकावा करत एक दिवस आधीच मुंबई गाठली, 23 एप्रिलला शिवसैनिकांनी राणांच्या मुंबईतील घरावर हल्ला केला.

हेही वाचा - MNS Chalo Ayodhya Poster in Mumbai : मनसेचे मुंबईत चला अयोध्या पोस्टर; 5 जूनला जाणार दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.