ETV Bharat / city

नवी मुंबईत आढळले 224 नवे कोरोनाबाधित; तर 5 जणांचा मृत्यू

काल (शुक्रवार) 224 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 108 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून 5 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई कोरोना अपडेट
नवी मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 27, 2020, 12:29 PM IST

नवी मुंबई - कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काल (शुक्रवार) 224 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 108 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून 5 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शहरात सध्या 2 हजार 365 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 194 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या 20 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या नवी मुंबईत झपाट्याने वाढत आहेत. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 5 हजार 874 कोरोनाबाधित आढळून आले असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 19 हजार 3 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 12 हजार 192 जण निगेटिव्ह आले असून, 958 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.

सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 853 इतकी आहे. काल 224 जण (26 जून ) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात तुर्भेमधील 12, बेलापूरमधील 28, कोपरखैरणेमधील 30, नेरुळमधील 38, वाशीतील 19, घणसोलीमधील 27, ऐरोलीमधील 54, दिघ्यातील 16, असे एकूण 224 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 76 स्त्रिया व 148 पुरुषांचा समावेश आहे.

शहरात 5 हजार 853 इतका कोरोना रुग्णांचा आकडा झाला आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 3 हजार 294 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. तर, आज 106 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. बेलापूर 8, नेरूळ 7, वाशी 17, तुर्भे 32, कोपरखैरणे 14, घणसोली 12, ऐरोली 15, दिघा 1 अशा एकूण 106 व्यक्ती शुक्रवारी कोरोनामुक्त झाल्या आहेत. यामध्ये 44 स्त्रिया आणि 62 पुरुषांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.