ETV Bharat / city

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांची समीर वानखेडेंच्या घरी भेट - समीर वानखेडे

मुंबई: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या निवासस्थानी भेट दिली, समीर वानखेडे हे ड्रग्ज क्रूझ प्रकरणातील तपासाचे प्रभारी आहेत.

National Commission for Scheduled Castes Vice Chairmen Arun Haldar visits the residence of NCB officer Sameer Wankhede
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्षांची समीर वानखेडेंच्या घरी भेट
author img

By

Published : Oct 31, 2021, 6:03 PM IST

Updated : Oct 31, 2021, 6:58 PM IST

मुंबई - राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या निवासस्थानी भेट दिली, यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा झाली. तसेच हलदर यांच्यासमोर यावेळी वानखेडे कुटुंबियांनी आपली बाजूही मांडली.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांची समीर वानखेडेंच्या घरी भेट

क्रांती रेडकर म्हणाल्या -

वानखेडे कुटुंबियांनी जात प्रमाणपत्रावरुन झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील सांगताना समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाल्या, "या प्रकरणाशी संबंधीत काही मूळ कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी हलदर आमच्या घरी आले होते. आता आमच्यावर आरोप करणाऱ्यांची चौकशी केली जाईल."

समीर वानखेडेंनी घेतली होती भेट -

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांनी शनिवारी मुंबईत अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली होती. त्यांनी त्यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यांनी स्वतःवरील धर्मांतराच्या आरोपांवर आपले मत उपाध्यक्षाना सांगितले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर धर्मांतराच्या विरोधात आरोप लावले होते त्यासंदर्भात समीर वानखडे यांनी आयोगापुढे आपली बाजू मांडली होती.

शनिवारी म्हणाले होते हलदर असे काही -

शनिवारी उपाध्याक्ष हलदर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले होते की, समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण देत आठ पानी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे. यावरून मला असे वाटते की समीर वानखेडे हे अनुसूचित जातीचे आहेत. ते कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर वरती आलेले आहेत. त्यानी धर्मांतर केल्याचा आरोप नाकारला आहे. असे ते म्हणाले, तसेच महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात तपास करण्यासाठी दिलेले दिवस अजून पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे आम्ही दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकूणच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. तसेच यावेळी आयोगाने एखाद्या अधिकाऱ्यावर जाती संदर्भात अशी कोणी वैयक्तिक टीका केली तर ती सहन केली जाणार नाही असे म्हणत राज्य सरकारला यासंदर्भात दहा दिवसांमध्ये आपले मत आयोगासमोर मांडण्याचे सांगितले आहे. त्यानंतर आज स्वतः राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी भेट दिली आहे.

हेही वाचा - समीर वानखेडे अनुसूचित जातीचेच!, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांची प्रतिक्रिया

Last Updated : Oct 31, 2021, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.