ETV Bharat / city

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा कॉमेडी जॉनरचा पहिला चित्रपट, "टीडीएम"!

राष्ट्रीय पुरस्कार विजेते (National award winner) भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे ( Bhaurao Nanasaheb Karhade) यांचा कॉमेडी जॉनरचा पहिला चित्रपट, "टीडीएम"! हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत ( debut film in the comedy genre TDM ) आहे. 'ख्वाडा', 'बबन' चित्रपटाच्या यशानंतर भाऊराव कऱ्हाडेंचा एक नवीन चित्रपट येऊ घातलाय ज्यात त्यांनी कॉमेडी जॉनर पहिल्यांदाच हाताळला आहे. 'टीडीएम' या चित्रपटातून ते प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणार आहेत.

author img

By

Published : Jul 24, 2022, 7:42 PM IST

TDM
टीडीएम

मुंबई: 'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत तर निर्माते भाऊराव कऱ्हाडे निर्मित 'टीडीएम' या आगळ्यावेगळ्या नावाच्या सिनेमातून भाऊराव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेत यशस्वी ठरलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा 'बबन' हा चित्रपटही सुपरहिट ठरला. ग्रामीण भागातील वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या भाऊरावांना सिनेइंडस्ट्रीत ओळखले जाते.

'हैद्राबाद कस्टडी' हा त्यांचा सिनेमाही २०२३ मध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांचे दोन्ही सिनेमे याच धाटणीचे असले तरी भाऊराव आता एका वेगळ्या धाटणीचा नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. विशेष म्हणजे कॉमेडी जॉनर घेऊन भाऊराव पहिल्यांदाच या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील करीत आहेत. चित्रपटाचे पोस्टर पाहता पाठमोरा व्यक्ती नेमका कोण आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल, शिवाय पोस्टरवरील गावाकडील रम्य सकाळ पाहता चित्रपटाचे कथानक नेमके काय असेल, याची उत्सुकता अधिकच ताणली जात आहे.

विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या कथेला आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला भाऊराव प्रेक्षकांसमोर कसे मांडणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यामुळे त्यांचा हा 'टीडीएम' हा आगामी कॉमेडी जॉनरचा सिनेमा रसिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. याबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे असे म्हणाले की, "एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शन दोन्हीची धुरा मी या कॉमेडी जॉनरच्या 'टीडीएम' चित्रपटात वाहिली आहे. कॉमेडी जॉनर पहिल्यांदा करत असल्याने मी ही या चित्रपटाला घेऊन खूप उत्सुक आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी वाहिली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. टीडीएम या नावातच वेगळं काहीतरी असणाऱ्या आणि हास्याची मेजवानी घेऊन येणाऱ्या या सिनेमाची रंगत भाऊरावांनी कुठवर नेऊन ठेवलीय हे लवकरच प्रेक्षकांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा: Rajinikanth : अभिनेता रजनीकांतचा आयकर विभागाकडून गौरव.. तामिळनाडूत भरला सर्वाधिक कर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.