ETV Bharat / city

Nari Shakti : आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातही महिलांचा ऊंच झेंडा

आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर (Nari Shakti) आहेत. महिला विविध क्षेत्रात आव्हानात्मक कामे सहजपणे पार पाडीत असल्या तरी त्यामागे त्यांची अथांग मेहेनत आहे (High flag of women) यात शंका नाही. आपत्कालीन व्यवस्थापन (in the field of emergency management) हे देखील एक असे क्षेत्र आहे. ज्यात महिलांचा सहभाग असणे गरजेचे आहे. आपत्कालीन व्यवस्थापन प्रत्येक घराघरात पोहोचल्यास प्रत्येकास आपत्तीजनक परिस्थितीत प्रभावीपणे सामोरे जाण्याचे धैर्य प्राप्त होईल. आज ज्या छोट्या छोट्या घटनांचे रुपांतर मोठमोठ्या आपत्तींमध्ये होत आहे. ते रोखणे जरी शक्य नसले तरी त्याचा प्रभाव कमी करणे सहज शक्य होणार आहे. असे मत मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी (Chief Officer of Emergency Management Department of Mumbai Municipal Corporation) रश्मी राजेंद्र लोखंडे (Rashmi Rajendra Lokhande) यांनी व्यक्त केले.

Nari Shakti
रश्मी राजेंद्र लोखंडे
author img

By

Published : Aug 10, 2022, 7:49 PM IST

मुंबई : आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर (Nari Shakti) आहेत. महिला विविध क्षेत्रात आव्हानात्मक कामे सहजपणे पार पाडीत असल्या; तरी त्यामागे त्यांची अथांग मेहेनत आहे (High flag of women), यात शंका नाही. आपत्कालीन व्यवस्थापन हे देखील एक असे क्षेत्र (in the field of emergency management) आहे. ज्यात महिलांचा सहभाग असणे, गरजेचे आहे. आपत्कालीन व्यवस्थापन प्रत्येक घराघरात पोहोचल्यास, प्रत्येकास आपत्तीजनक परिस्थितीत प्रभावीपणे सामोरे जाण्याचे धैर्य प्राप्त होईल. आज ज्या छोट्या छोट्या घटनांचे रुपांतर मोठमोठ्या आपत्तींमध्ये होत आहे. ते रोखणे जरी शक्य नसले; तरी त्याचा प्रभाव कमी करणे सहज शक्य होणार आहे. असे मत मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी (Chief Officer of Emergency Management Department of Mumbai Municipal Corporation) रश्मी राजेंद्र लोखंडे (Rashmi Rajendra Lokhande) यांनी व्यक्त केले.

आपत्कालीन व्यवस्थापन विभागात १९९९ पासून कार्यरत : सन १९९९ मध्ये महापालिका मुख्यालय नवीन इमारतीच्या तळघरात दोन छोट्या खोल्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. सुरक्षा दलात बजावलेल्‍या उत्तम कामगिरीमुळे, टंकेलेखन, दूरध्वनी हाताळणे, बिनतारी यंत्रणा हाताळण्याचे ज्ञान असल्यामुळे, नियंत्रण कक्षात तात्पुरत्या स्वरुपावर माझी नेमणूक करण्यात आली. १९९९ ते आजतागायत बृहन्मुंबईत घडलेल्या विविध आपत्तींमध्ये मग तो २६ जुलै चा महापूर असो, इमारत, दरडी कोसळण्याच्या घटना असोत, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट असो, किंवा कोवीड-१९ महामारी असो या सर्व आपत्तींमध्ये माझ्या नियंत्रण कक्षातील सहका-यांसोबत दिवसरात्र काम करण्याचा अनुभव थरारक तर आहेच. परंतु, आपण समाजाच्या काहीतरी उपयोगी येत आहोत, ही भावना समाधान देणारी आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभाग हा वर्षाचे ३६५ दिवस २४ तास कार्यरत असतो. बृहन्मुंबईत उद्भवणा-या कोणत्याही आपत्तीस प्रतिसाद देण्याच्या कामी, संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याकरिता कायम सतर्क रहाणे आवश्यक असते. आपत्तीस प्रतिसाद देणे, हे या विभागाचे एकमेव काम नसून; आपत्कालीन व्यवस्थापन चक्रातील प्रतिबंध, उपशमन, सज्जता, मदत व पुनर्वसन याबाबत ही विविध प्रकारची कामे येथून केली जातात, असे लोखंडे यांनी सांगितले.

कुटूंबियांचेही सहकार्य : काम कोणतेही असो त्यात जर आव्हान नसेल, तर ते रुक्ष व कंटाळवाणे होऊन जाते. येथे तसे नाही, प्रत्येक दिवस काहितरी नवीन काम, नवीन आव्हान घेऊन येतो. आणि मग घर, कुटुंब या बाबी अनेकवेळेस बाजुला पडतात. माझे सुदैव आहे की मी आणि माझे पती एकाच विभागात काम करीत आहोत. माझे पती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात आपत्कालीन व्यवस्थापनाचे 'प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण' देण्याचे काम करतात. त्यांनी आतापर्यंत जवळपास एक लाखापेक्षा जास्त लोकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण दिले आहे. आम्ही एकत्रित कुटुंब पध्दतीत रहातो. माझे सासु सासरे, दीर जाऊ, मुले यांना आमच्या कामाचे स्वरुप माहित असल्यामुळे, आम्हाला कोणत्याही गोष्टींचा आग्रह केला जात नाही किंवा तक्रार केली जात नाही, असे लोखंडे म्हणाल्या.

जागतिक महिला दिनी पुरस्कार : आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे या १९९५ पासून महापालिकेच्या सेवेत असून वर्ष १९९९ पासून त्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात कार्यरत आहेत. वरीष्ठ अधिकारी उपायुक्‍त किेशोर गांधी आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर हे अत्यंत हुशार व अनुभवी असल्यामुळे, त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेऊन मी आज या पदापर्यंत पोहोचू शकले आहे. आमच्या विभागास लाभलेले अतिरिक्त आयुक्त यांनी वेळोवेळी आम्हाला प्रोत्साहन दिले आहे. सन २०१७ मध्ये तत्कालिन महापौर यांच्या हस्ते 'जागतिक महिला दिनी' देण्यात आलेला पुरस्कार व सन २०१७ मध्ये महानगरपालिका आयुक्त यांच्या हस्ते देण्यात आलेला ‘Officer of the Month’ हा पुरस्कार त्याचाच एक भाग असल्याचे मी मानते, असे लोखंडे यांनी सांगितले.

'ऑफिसर ऑफ द मंथ' बहुमान : मुंबईत २९ ऑगस्टला अतिवृष्टीमुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती. या दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे अत्यंत तत्परतेने व सक्षमपणे विविध जबाबदा-या पार पाडण्यात आल्या. तसेच अतिवृष्टीशी संबंधित असणा-या सर्वच यंत्रणांशी सुयोग्य समन्वय साधून, अपेक्षित कार्ये वेळेत पूर्ण करण्यात आली. या सर्व बाबी ज्यांनी आपल्या सहका-यांसह पूर्ण केल्यात. त्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या उपप्रमुख अधिकारी रश्मी उर्फ संगीता राजेंद्र लोखंडे यांचा 'सप्टेंबर २०१७' या महिन्यासाठी 'महिन्याचे मानकरी' अर्थात 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने गौरविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

हेही वाचा : Nari Shakti Puraskar : महाराष्ट्रातील फर्स्ट वुमन स्नेक रेस्क्यूअरला राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.