ETV Bharat / city

धक्कादायक! एनसीबीच्या जाळ्यात टॅक्सीचालक; कोट्यवधीची संपत्तीसह महागड्या वाहनांचा आहे मालक - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई न्यूज

नवाब शेख हा टॅक्सी चालक म्हणून व्यवसाय करत आहेत. असे असले तरी दक्षिण मुंबईत राहत असलेल्या घराचे मासिक भाडे 70 हजार रुपये देतो. दक्षिण मुंबईतील लॅमिंग्टन रोड येथील एका 60 मजली इमारतीच्या 25 व्या मजल्यावर आरोपी नवाब शेख हा कुटुंबियांसोबत राहत होता.

एनसीबी
एनसीबी
author img

By

Published : Dec 2, 2020, 4:41 PM IST

मुंबई- अमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भातील तपासात सतत नाट्यमय घटना समोर येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अमली पदार्थांच्या तस्करीचा तपास करताना मुंबईतील टॅक्सी चालकाला अटक केली आहे. टॅक्सीचालक हा कोट्याधीश असल्याने अधिकारीही चक्रावून केले आहेत. नवाब शेख असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

एनसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीवरून एमडी या अमली पदार्थ तस्करीच्यासंदर्भात कारवाई केली जात होती. यामध्ये नवाब शेख याला अटक करण्यात आली.

फ्लॅटचे मासिक भाडे 70 हजार रुपये!

नवाब शेख हा टॅक्सी चालक म्हणून व्यवसाय करत आहेत. असे असले तरी दक्षिण मुंबईत राहत असलेल्या घराचे मासिक भाडे 70 हजार रुपये देतो. दक्षिण मुंबईतील लॅमिंग्टन रोड येथील एका 60 मजली इमारतीच्या 25 व्या मजल्यावर आरोपी नवाब शेख हा कुटुंबियांसोबत राहत होता. या टू बीएचके फ्लॅट्सचे महिन्याला 70 हजार रुपये भाडे आहे.

हेही वाचा-मुंबई : कारवाई करणाऱ्या एनसीबी पथकाला धक्काबुक्की; तीन जणांना १४ दिवसांची कोठडी

टॅक्सी चालकाकडे सापडल्या महागड्या चारचाकी
नवाब शेख याच्या घरातील बेडरूम, हॉल व बाथरूममधून 10 एलएसडी ब्लॉट्स व 32 ग्राम एमडी एनसीबीने हस्तगत केले आहे. या बरोबरच नवाबचा साथीदार फारुख चौधरी यालासुद्धा अटक केली आहे. नवाबच्या नावावर असलेल्या महागड्या चारचाकी आढळून आल्या आहेत. नवाब हा चालवत असलेली टॅक्सीसुद्धा एनसीबीने जप्त केली आहे. या आरोपीच्या घरात राहत असलेला त्याचा मुलगा व सून हे उच्चशिक्षित आहेत.

हेही वाचा-कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष यांना जामीन मंजूर!
नवाब शेख याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये दक्षिण मुंबईत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या ड्रग्स पेडलरचे नाव समोर आले आहे. दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या अमली पदार्थाच्या तस्करी संदर्भात अधिक तपास केला जात आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अमली पदार्थ तस्करीप्रकरणात सखोल तपास सुरू केला आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.