ETV Bharat / city

सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक - Siddharth Pathani

अमली पदार्थ तस्करी प्रकरणी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अ

author img

By

Published : May 28, 2021, 12:16 PM IST

Updated : May 30, 2021, 9:55 AM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग सिंडिकेट बाबतीत तपास सुरू आहे. या तपास प्रक्रियेत सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी या आरोपीला अमली पदार्थ तस्करीसंदर्भात एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. पिठाणीला हैदारमधून अटक करण्यात आली आहे.

सिद्धार्थ पिठाणी हा मृत सुशांत सिंग याचा जवळचा मित्र मानला जातो. या अगोदरही सिद्धार्थ पिठाणी यांची याची ईडी, एनसीबी व सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अमलीपदार्थ संदर्भात एनसीबीकडून त्याला आज अटक करण्यात आली आहे.

सिद्धार्थ पिठाणी स्वतःला फिल्म निर्माता आणि अभिनेता असल्याचे सांगतो. सिद्धार्थने अनेक वेळा आपण सुशांतचे क्रिएटिव्ह मॅनेजर असल्याचे माध्यमांना सांगितले होतं. तपास यंत्रणांनी सिद्धार्थ पिठाणी याच्या बँक खात्यात संदर्भात देखील अनेक वेळा विचारणा केली होती. सिद्धार्थ यान रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत सिंह राजपूत याचे पैसे खर्च केल्याचा आरोप देखील केला होता.

सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक

सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणातही यापूर्वीच चौकशी-

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने जून 2020 मध्ये मुंबईतील बांद्रा स्थित घरामध्ये आत्महत्या केली होती. गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या सुशांत सिंग राजपूत याच्या सोबत त्या वेळेस त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी हा घरामध्ये उपस्थित असल्यामुळे त्याची वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून चौकशी केली जात असताना काही व्हाट्सअप चॅट हे अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात ईडीला मिळाले होते. त्यानंतर सदरचे व्हाट्सअप चॅट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देण्यात आलेले होते. त्यानंतर वेगवेगळ्या व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली होती.

सुशांत सिंग राजपूत यास अमली पदार्थांचा पुरवठा करण्याच्या कामात सिद्धांत पिठाणी याचा मुख्य सहभाग असल्याचा त्यावेळेस एनसीबीच्या तपासात समोर आले होत. सिद्धार्थ पिठाणी हा हैदराबाद मध्ये असल्याचा कळल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथे जाऊन त्यास अटक केली. त्यानंतर त्याची ट्रांजिस्ट रिमांड घेऊन मुंबईत आणण्यात आले आहे.

Last Updated : May 30, 2021, 9:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.