ETV Bharat / city

ते दुकान तर बंदच आहे...नारायण राणेंचा जनता दरबारात महाविकास आघाडीला टोला - सहाय्यक अधिकारी यशोवर्धन बारामतीकर

अधिकारी वारंवार लघू- सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग मंत्रालय असा उल्लेख न करता फक्त मंत्रालय.. मंत्रालय असा उल्लेख करत होते. बऱ्याचदा अधिकाऱ्यांकडून हा उल्लेख आल्यानंतर राणेंनी त्यांना थांबवत कोणते मंत्रालय ते उपस्थितांना नीट समजावून सांगा? नाही तर हे उद्यापासून बाजूच्या मंत्रालयात जातील. ज्यांचे दुकान सध्या बंद असल्याचे वक्तव्य नारायण राणे यांनी केले.

नारायण राणे
नारायण राणे
author img

By

Published : Oct 23, 2021, 8:25 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी नेहमीच ओळखले जातात. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राणेंच्या जनता दरबारामध्येदेखील असेच काही किस्से पहायला मिळाले.

केंद्रातील सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा जनता दरबार भाजपने सुरू केला. तरी आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दरबार भरवला जात आहे. याची सुरुवात केंद्रीय लघु-सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनता दरबाराने झाली.

मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या जनता दरबारात राणेंकडे असलेल्या खात्यात कोणकोणत्या योजना आहेत आणि कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध होतील याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. या प्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिता वर्मा व सहाय्यक अधिकारी यशोवर्धन बारामतीकर उपस्थित होते. हे अधिकारी ही माहिती उपस्थितांना सादरीकरणाद्वारे सांगत होते.

हेही वाचा-आरएसएसची मते फक्त उजवी नाही तर काही डाव्या विचारसरणीसारखी - दत्तात्रय होसाबळे

महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला

अधिकारी वारंवार लघू- सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग मंत्रालय असा उल्लेख न करता फक्त मंत्रालय.. मंत्रालय असा उल्लेख करत होते. बऱ्याचदा अधिकाऱ्यांकडून हा उल्लेख आल्यानंतर राणेंनी त्यांना थांबवत कोणते मंत्रालय ते उपस्थितांना नीट समजावून सांगा? नाही तर हे उद्यापासून बाजूच्या मंत्रालयात जातील. ज्यांचे दुकान सध्या बंद असल्याचे वक्तव्य राणे यांनी केले. नारायण राणे यांचा जनता दरबार सुरू होता, त्याच्या शेजारीच मंत्रालय आहे. राणे यांनी हा खोचक टोला लगावत महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

हेही वाचा-विक्री न झाल्याने शेतकऱ्याने धान्याला लावली आग; वरुण गांधींनी योगी सरकारला दिला घरचा आहेर

सगळाच खर्च केंद्राने केला तर हे येथे बसून काय करणार?

जनता दरबारावेळी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकारही उपस्थित होते. या प्रसंगी एका उद्योजकाने राज्यात पायाभूत सुविधा केंद्राने करून द्याव्यात, राणे यांनी मनात आणले तर काहीही होऊ शकते, असे नारायण राणे यांना सांगितले. यावेळी राणेंनी, सगळाच खर्च केंद्राने केला तर हे इथे बसून काय करणार? असे म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

हेही वाचा-पाकिस्तानी महिलेशी चर्चा करूनच अमरिंदर यांच्याकडून मंत्र्यांची व्हायची नियुक्ती- नवज्योत कौर

अधिकाऱ्यांना म्हणाले मराठीत बोला

सगळ्यात महत्वाचे म्हणजे सादरीकरणाची सुरुवात करताना अधिकाऱ्यांनी हिंदीमध्ये सुरुवात केली. मात्र राणेंनी त्यांना हिंदी ऐवजी मराठीत बोला. तुम्ही उत्तम मराठी बोलता असे मला कळल्याचे सांगत संपूर्ण सादरीकरण मराठीत बोलायला अधिकाऱ्यांना भाग पाडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.