मुंबई - याप्रसंगी बोलताना नारायण राणे म्हणाले की, आमदार व पक्षाशी गद्दारी खरी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्रीपद त्यांनी गद्दारी करूनच मिळवलं. एक तर भारतीय जनता पक्षाशी गद्दारी केली. (Modi Express Train) तसेच, कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याशी गद्दारी केली. आमदारांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही, त्यांना भेटीगाठी दिल्या नाहीत, त्यामुळे खरे गद्दार हे उद्धव ठाकरे आहेत, असे सांगत ठाकरे सरकारने मेट्रो ट्रेन बंद पाडली. विकास म्हणजे फक्त पैसा कमावणे हा त्यांचा उद्देश होता. (Narayan Rane criticizes Uddhav Thackeray) परंतु, आता शिंदे फडवणी सरकार देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये लोकांच्या भल्यासाठी व विकासासाठी मेट्रो ट्रेन पुन्हा सुरू करत आहे असेही नारायण राणे यांनी सांगितले आहे.
ठाकरे सरकार गणरायाच्या कृपेने कोसळले - ठाकरे सरकार कोसळले ही गणरायाची कृपा आहे. घरात बसून मुख्यमंत्री पद हाताळता येत नाही. अडीच वर्षात महाराष्ट्र किमान दहा वर्षे मागे गेला आहे, असे सांगत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Narayan Rane Vs Uddhav Thackeray) तसेच, हे सरकारसुद्धा गणरायाच्या कृपेने आलेले आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे असे असताना राज्य सर्वांगीण विकास करेल असा आशावादही नारायण राणे यांनी व्यक्त केला.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊन, काय बोलणार? - शिवाजी पार्कवर यंदा होणारा दसरा मेळावा कोणाचा? यावर बोलताना नारायण राणे यांनी सांगितले आहे की, ठाकरे सरकार गेल्यावर त्यांचा आवाज आता बंद झाला आहे. तसेच, त्यांच्याकडे आता आमदार किती उरले आहेत? शिंदे गटाबरोबर जे आमदार गेले त्याच्यानंतर आता जे आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत आहेत तेही लवकरच आता शिंदे गटात जाणार आहेत. ते सर्व ऑन द वे आहेत असे सांगत, शिवाजी पार्कवर मेळावा घेऊन काय बोलणार? बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे जेवढे मेळावे झाले त्या सर्वांमध्ये माणसं धरून आणून बसवली होती असा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. ही शिवसेना आता संपलेली आहे, आता शिंदे हीच खरी शिवसेना असल्याचेही राणे यांनी सांगितले आहे. तसेच, राज ठाकरेंसोबत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढत चालल्या आहेत, यावर बोलताना त्यांनी सांगितले की, याबाबत भाजपचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
हेही वाचा - Dussehra Gathering: दसरा मेळावा कुणाचा? शिंदे गाटाचा, ठाकरे गटाचा की राज'गर्जना होणार; वाचा सविस्तर