मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुंबई पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी राणे पिता पुत्र मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. जवाब नोंदवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त विशाल ठाकुर आणि पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. यावेळी राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
नारायण राणेंसोबत भाजपचे काही कार्यकर्तेही येणार असल्याची माहिती आहे, या अनुषंगाने पोलिसांनी कोणत्याही प्रकारची गर्दी झाल्यास आजूबाजूच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई पोलीस राणे पिता-पुत्रांचे स्टेटमेंट नोंदवणार आहेत. पण या प्रकरणात नारायण राणे यांनी यापूर्वीच अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्यांना दिलासा देत अटक करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे नारायण राणे यांना अटक करता येणार नाही. आज दुपारी नारायण राणे आणि नितेश राणे मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचणार आहेत.