ETV Bharat / city

काँग्रेस हा राष्ट्रीय आघाडीचा आत्मा असल्याचा संजय राऊत यांना साक्षात्कार - नाना पटोले

संजय राऊत यांना काँग्रेस राष्ट्रीय आघाडीचा आत्मा असल्याचा साक्षात्कार झाल्याचे नाना पटोले म्हणाले. त्यांनी यूपीमध्ये शिवसेनेला सामील व्हायच असेल तर त्यांचे स्वागत असल्याचे म्हटले आहे.

Nana Potle has expressed satisfaction that Sanjay Raut is understood to be the soul of the Congress National Front
संजय राऊत यांना काँग्रेस राष्ट्रीय आघाडीचा आत्मा असल्याचा साक्षात्कार - नाना पटोले
author img

By

Published : May 10, 2021, 8:51 PM IST

Updated : May 10, 2021, 9:08 PM IST

मुंबई- राष्ट्रीय आघाडीमधला आत्मा काँग्रेस पक्षात असेल असा साक्षात्कार खासदार संजय राऊत यांना झाला, ही चांगली गोष्ट आहे. युपीएमध्ये यायचे असेल तर शिवसेनेचे काँग्रेसकडून स्वागत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना राष्ट्रीय आघाडीचा आत्मा काँग्रेस पक्ष असल्याचा साक्षात्कार झालाय, ही चांगली गोष्ट आहे. असा चिमटा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काढला आहे. खासदार संजय राऊत यांनी देशात राष्ट्रीय आघाडी काढली जावी. मात्र, ही आघाडी काँग्रेस पक्षाच्या शिवाय असू शकत नाही. या आघाडीचा आत्मा काँग्रेस पक्षच असू शकेल. यासंबंधी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत चर्चा देखील केली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर संजय राऊत यांना चिमटा काढत नाना पटोले यांनी संजय राऊत यांना साक्षात्कार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र, देशांमध्ये आधीपासूनच युपीए अस्तित्वात आहे. या यूपीएचे नेतृत्व काँग्रेस पक्ष करत असून, आता देशातील जनतेला कळून चुकले की, या देशात काँग्रेस शिवाय पर्याय नाही. मात्र, तिसरी आघाडी तयार करण्यासंदर्भात कोण विचार करत असेल तर, ते देशाच्या हिताचे ठरणार नाही. कोणी तिसरी आघाडी काढायला निघाले असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला देश वाचवायचा आहे. देश वाचवायला काँग्रेस सक्षम आहे, असा इशाराही नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

यूपीएमध्ये शिवसेनेचे स्वागत -

देश उभारणीत काँग्रेसचा खूप मोठ योगदान आहे. त्यामुळे येणारा काळातही देशासाठी काँग्रेस शिवाय पर्याय नाही हे देशातल्या जनतेने ओळखले आहे. त्यामुळे यूपीए मध्ये अजून कोणी घटक पक्ष सामील होण्यासाठी तयार असेल तर, त्यांचे काँग्रेसकडून स्वागतच केले जाईल. शिवसेना महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये सामील आहे. येणाऱ्या काळात त्यांनादेखील यूपीमध्ये सामील व्हायच असेल तर, त्यांचेही स्वागत आहे. असे देखील यावेळी नाना पटोले यांच्या कडून सांगण्यात आले.

Last Updated : May 10, 2021, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.