ETV Bharat / city

Congress Protest Against Modi : फडणवीसांच्या घराबाहेरचं आंदोलन मागे, पटोले म्हणाले, "मोदींनी महाराष्ट्राची..." - maharashtra congress spread corona

देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर काँग्रेसने आंदोलन ( Congress Protest Fadnavis Home ) केले. मुंबईकरांची गैरसोई होऊ नये म्हणून काँग्रेसने आंदोलन तात्पुरते स्थगित केले ( Congress Protest stopped ) आहे. परंतु, भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाराष्ट्राला दाखवला आहे, असा घणाघात पटोलेंनी केला ( Nana Patole Criticized Bjp ) आहे.

Congress Protest Against Modi
Congress Protest Against Modi
author img

By

Published : Feb 14, 2022, 5:21 PM IST

मुंबई - महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना परसला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ( Modi Said Congress Spread Corona ) होते. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी माफी मागावी यासाठी काँग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात ( Congress Protest Fadnavis Home ) आले. मुंबईकरांची गैरसोई होऊ नये म्हणून आंदोलन तात्पुरते मागे घेत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राची माफी मागेपर्यंत आंदोलन सुरु राहिल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Nana Patole On Modi ) दिला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांच्या विचारांचा अपमान केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही आज मुंबईत आंदोलन केले. काँग्रेस अहिंसावादी आहे, हिंसावादी नाही. आम्हालाही गुंडगिरी करता येते पण ही आमची संस्कृती नाही. आम्हाला संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला. परंतु, भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाराष्ट्राला दाखवला आहे.

  • What PM Modi said about Maharashtra is wrong (accusing Congress of giving free train tickets to migrants to leave Mumbai). Protests outside residence of BJP leader (Devendra Fadnavis)has ended for today, but we'll continue protesting till PM doesn't apologize:Nana Patole,Congress pic.twitter.com/FFmRHC3sK3

    — ANI (@ANI) February 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल पण मोदींचे समर्थन करु, अशी भाजपाची वृत्ती आहे. भाजपासाठी नरेंद्र मोदी देशापेक्षा मोठे असतील आणि देवेंद्र फडणवीस त्यांना महाराष्ट्रापेक्षा मोठे वाटत असतील पण आमच्यासाठी देश, महाराष्ट्र व महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे. भाजपाने भाडोत्री लोकं उतरवत रस्त्यावर गर्दी केली. त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागला. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे आंदोलन आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत. पण हे आंदोलन सुरुच ठेवण्याची आमची भूमिका कायम आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

प्रसाद लाड कुठेही दिसले नाही

दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी खालच्या पातळीची भाषा वापरत फडणवीसांच्या बंगल्यावर येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. ते स्वीकारून काँग्रेस सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गनिमी कावा करत फडणवीस यांचे सरकारी निवासस्थान ‘सागर’वर थेट धडक मारली. पोलिसांनी त्यांची मुस्कटदाबी करत आपल्या ताब्यात घेतले. मात्र, त्यांना कुठेही प्रसाद लाड कुठेही दिसले नाही.

हेही वाचा - Devendra Fadnavis Criticized Congress : मोदींनी देशाची माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.