मुंबई - युक्रेन आणि रशिया ( Russia-Ukraine War ) यांच्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाचे रुपांतर आता युद्धात झाले आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय अडकले आहे. यात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काँग्रेस नेते नाना पटोलो यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थींनीशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला ( Nana Patole interacts with Mumbai's Chaitali ) आणि तिथली परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली आहे. तसेच निवडणूक प्रचार थांबवा आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सुखरूप परत आणा, मोदीजी, असेही म्हटलं.
-
यूक्रेन संकट में फंसी मुंबई की छात्रा चैताली से बात की| युद्ध की वजह से वहां हालात बेहद मुश्किल हैं और छात्र भारत सरकार से मदद की उम्मीद कर रहे हैं| चुनाव प्रचार बंद कर हमारे छात्रों को जल्द से जल्द सुरक्षित वापस लाईये मोदी जी| pic.twitter.com/c8KUHjhECf
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">यूक्रेन संकट में फंसी मुंबई की छात्रा चैताली से बात की| युद्ध की वजह से वहां हालात बेहद मुश्किल हैं और छात्र भारत सरकार से मदद की उम्मीद कर रहे हैं| चुनाव प्रचार बंद कर हमारे छात्रों को जल्द से जल्द सुरक्षित वापस लाईये मोदी जी| pic.twitter.com/c8KUHjhECf
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 25, 2022यूक्रेन संकट में फंसी मुंबई की छात्रा चैताली से बात की| युद्ध की वजह से वहां हालात बेहद मुश्किल हैं और छात्र भारत सरकार से मदद की उम्मीद कर रहे हैं| चुनाव प्रचार बंद कर हमारे छात्रों को जल्द से जल्द सुरक्षित वापस लाईये मोदी जी| pic.twitter.com/c8KUHjhECf
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 25, 2022
मुंबईमधील चैताली नावाची विद्यार्थींनी युक्रेनमध्ये अडकली आहे. तिने नाना पटोले यांना तेथिला परिस्थितीची माहिती दिली. 'युक्रेनमध्ये अडकलेली मुंबईतील चैताली या विद्यार्थिनीशी बोललो. युद्धामुळे तेथील परिस्थिती अत्यंत कठीण असून विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. मोदीजी, निवडणूक प्रचार थांबवा आणि आमच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सुखरूप परत आणा', असे टि्वट नाना पटोले यांनी म्हटलं.
युक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्वांच्या सुरक्षेची आम्हाला काळजी आहे. केंद्र सरकारने त्यांना वेळीच तेथून हटवायला हवे होते. हे परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे अपयश आहे. त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करून त्यांना तातडीने परत आणावे, असेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं.
युक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ही माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी टि्वट करून दिली आहे. या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांनी भारत सरकाराला केली आहे.
युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू -
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेननं सहकार्य केल्यास नाटोला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. मात्र, युक्रेनवर कब्जा करण्याचा आपला इरादा नसल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेनच्या सैन्यानं शस्त्र खाली ठेवून माघार घ्यावी, असे रशियाच्या राष्ट्राध्यांनी म्हटलं आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी कीव्हसह युक्रेनच्या सर्व भागातून नागरिक देश सोडून जात आहेत.
हेही वाचा - Russia Ukraine Crisis Live Updates : युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू; मोदी-पुतिनमध्ये चर्चा