मुंबई - देशामध्ये सध्या महागाई, बेरोजगारी ( Inflation And Unemployment In India ) असे अनेक प्रश्न ज्वलंत आहेत. मात्र, या प्रश्न डावलण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून धर्माबाबत ( BJP Religious Politics ) द्वेष पसरवला जात आहे. मात्र महागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत राहील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole Criticized BJP ) यांनी दिला आहे. आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला इशारा दिला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखंड भारताचे नेमकं व्हिजन काय, हे सर्वांसमोर ठेवावे. भारताला वेगळं करण्याचं काम त्यांनी करू नये, असा टोलाही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लगावला.
मोदी सरकारने एकही कोळसा खाण काढली नाही - सध्या देशावर आणि राज्यावर अभूतपूर्व वीज टंचाईचे संकट आहे. केंद्र सरकारने स्वतः राज्यांना कोळसा खरेदी करण्याचं सांगितलं असल्यानेच केंद्र सरकारकडे कोळसा नसल्याचं यातून स्पष्ट होते आहे. वीज टंचाईबाबत सध्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली. त्याबाबत भाजपने जनतेला अंधारात ठेवू नये. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी एकही कोळसा खाण खरेदी केली नसल्याची आठवणही नाना पटोले यांनी केंद्र सरकारला करून दिली.
काँग्रेस मंत्र्यांची आढावा बैठक - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मुंबई दौरा लवकरच होणार असून अद्याप तारीख ठरलेली नाही. मुंबईत असताना भेटी संदर्भातचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना दिले. तर, ते नक्की त्यांची भेट घेतील, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले. तसेच राहुल गांधी मुंबईत येण्याआधी मंगळवारी 19 फेब्रुवारीला सर्व काँग्रेस मंत्र्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलवली आहे. या बैठकीतून काँग्रेस मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.
'सर्व धर्मात लाऊडस्पीकर लावले जातात' - मशिदीवर लावण्यात येणार्या लाऊडस्पीकरबाबत भारतीय जनता पक्ष आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, लाऊड स्पीकर केवळ मुस्लीम धर्मासाठीच नाहीतर, सर्व धर्मांमध्ये वापरले जातात. मात्र, केवळ जीवेशू पसरवण्यासाठी मनसे आणि भाजपने हा मुद्दा उचलला असल्याचा आरोप नाना पटोलेने केला. लाऊड स्पीकरचा मुद्दा हा केवळ मुस्लीम धर्मापुरता मर्यादित नाही. त्यामुळे सर्वधर्मीय धर्मगुरूंनी बसून याबाबत चर्चा करून योग्य तो तोडगा काढला गेला पाहिजे, असा सल्लाही नाना पाटोलंकडून देण्यात आला आहे.
'झेड प्लस'साठी सोमैय्यांची धडपड - केंद्र सरकारचे पाप लपवण्यासाठी अशाप्रकारचे आरोप करण्याची भूमिका भाजपकडून सातत्याने केली जाते. किरीट सोमैय्या त्याचप्रकारे बेछूट आरोप करत आहे. आता किरीट सोमैय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. मात्र, आता झेड प्लस सुरक्षा मिळवण्यासाठी किरीट सोमैय्या यांची धडपड सुरू असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच न्यायालयात भारतीय जनता पक्षाच्या लोकांना दिलासा कसा मिळतो? यामुळे न्याय व्यवस्थेवर संशय घेतला जात असल्याचे मतं नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - Power Crisis and Fact : राज्यातील भारनियमनाचे संकट आणि वस्तुस्थिती