मुंबई - काही दिवसातच राज्यातील 5 महापालिकेच्या निवडणुकी होणार आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतुन लढण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असला तरी, आघाडी करण्याआधी स्थानिक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांची मतं विचारात घेतल्याशिवाय निर्णय घेतला जाणार नाही असे काँग्रेसचे प्रदेशाद्याक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केल आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी सोबतच असेल याबद्दल सध्यातरी खात्री देता येत नाही. नुकत्याच पार पडलेल्या सांगली महानगर पालिकेच्या महाविकास आघाडीला यश मिळाले असून भाजपची सत्ता उलथून महाविकास आघाडीचे सरकार सांगली महानगर पालिकेत आले. मात्र, येणाऱ्या महानगर पालिकेत आघाडी करत असताना स्थानिक कार्यकाऱ्यांशी चर्चा केली जाईल असा नाना पटोले यांनी काँग्रेच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेस स्वतंत्र लढवणार -
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होणार असून त्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत काँग्रेस सर्व जागा लढवणार असल्याच जाहीर केलं. नाना पटोले यांनी देखील भाई जगताप यांच्या वक्तव्याला दुजोरा देत मुंबईत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवर असल्याच स्पष्ट केलंय. त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सांगलीत अजूनही काही नगरसेवक आमच्या संपर्कात -
सांगली महानगर पालिकेत सत्ता पालट होऊन सांगली महानगर पालिकेत असलेली भाजपची सत्ता आता महाविकास आघाडीकडे गेली आहे. महानगर पालिकेत भाजपची सत्ता आल्या नंतर त्यांच्या कारभाराला कंटाळून भाजपच्या नगरसेवकांनी महाविकास आघाडीला साथ दिली असल्याची माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. तसेच येणाऱ्या काळात अजूनही काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून तेही लवकरच काँग्रेसमध्ये सामील होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.