नालासोपारा : ( मुंबई ) नालासोपारा आता अमली पदार्थनिर्मितीचा केंद्रबिंदू ( Nalasopara Drug Manufacturing Centre ) ठरतेय की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या ( Mumbai Crime Branch ) अंमली पदार्थविरोधी सेलने नुकत्याच केलेल्या कारवाईत या नालासोपारा पश्चिम सीताराम बिल्डिंग चक्रधर नगर परिसरातून तब्बल १ हजार ४०० कोटी रुपये किमतीचे ७०० किलो मेफेड्रोन जप्त केले ( Seizure of narcotics MD-maphedrone ) आहे. त्यामुळे नालासोपारा हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नालासोपारा येथील एका औषध निर्मिती युनिटवर छापा टाकल्यानंतर तेथे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन ( MD - maphedrone ) तयार करण्यात येत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
चार आरोपींना मुंबईतून अटक- या प्रकरणी चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर, नालासोपारा येथे एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. अलीकडच्या काळात पकडलेला हा सर्वात मोठी अंमली पदार्थ साठा असल्याचे सांगितले जाते. अमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेंतर्गत अमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटअमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, पुरवठा, साठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, गोवंडी-शिवाजीनगर येथून संशयित आरोपीला एमडी मॅफेड्रॉनसह ताब्यात घेण्यात आले होते. अन्य चार आरोपींच्या चौकशीत पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली होती. या आरोपीने रसायन शास्त्रात ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे शिक्षण घेतलेले आहे. वेगवेगळी केमिकल एकत्र करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून एमडी (मॅफेड्रॉन) हा मादक पदार्थ बनविण्याचे ज्ञान त्याने आत्मसात केले होते. मागणीप्रमाणे तो हा पदार्थ गिऱ्हाईकांना विकत असतो, अशी माहिती प्राथमिक तपासात या युनिटला मिळाली होती. स्वत:ची ओळख लपवण्यासाठी हा आरोपी वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
-
Anti Narcotics Cell of Mumbai Police seized 703 kg of MD drug from Nalasopara area. The seized drug consignment is worth around Rs 1400 crores. Five drug peddlers arrested: Datta Nalawade, DCP Anti-Narcotics Cell pic.twitter.com/gX4h6hYwbH
— ANI (@ANI) August 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Anti Narcotics Cell of Mumbai Police seized 703 kg of MD drug from Nalasopara area. The seized drug consignment is worth around Rs 1400 crores. Five drug peddlers arrested: Datta Nalawade, DCP Anti-Narcotics Cell pic.twitter.com/gX4h6hYwbH
— ANI (@ANI) August 4, 2022Anti Narcotics Cell of Mumbai Police seized 703 kg of MD drug from Nalasopara area. The seized drug consignment is worth around Rs 1400 crores. Five drug peddlers arrested: Datta Nalawade, DCP Anti-Narcotics Cell pic.twitter.com/gX4h6hYwbH
— ANI (@ANI) August 4, 2022
हेही वाचा - Brutal Beating : बाप-लेकांचा राडा, घटना सीसीटीव्हीत कैद
एमडी-मॅफेड्रॉन सदृश अमलीपदार्थ जप्त - या कारवाई पोलिसांनी त्याच्याकडून ७०१ किलो ७४० ग्रॅम वजनाचा एमडी-मॅफेड्रॉन सदृश अमलीपदार्थ जप्त केला आहे. या पदार्थाची किंमत १४०३ कोटी ४८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान स्थानिक पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी सदर इसमाकडे औषधे बनवण्याचं परवाना होता. त्याची फार्मासिस्टची पदवी असल्याने कोणाला संशय आला नसून तो रेकॉर्ड वरचा गुन्हेगार नाही. याठिकाणी फक्त तो बॉक्स ठेवत होता. त्याच औषधे बनवण्याचं कोणताही साहित्य इथे नव्हत. दरम्यान शेजारी दुकानाराला आम्ही औषधे बनवतो. कधी कधी गाळा खोलायचे कधी कधी त्यांच्या मिटिंग व्हायच्या पण त्यांच्याकडे लायसन्स असल्याचे सांगितल्याने कधी संशय आला नाही. अनेकदा टेम्पो ने मालाची ने आण करायचे अस शेजारी संतोष कनोजिया यांनी सांगितले.
हेही वाचा - Phone Tapping Case : संजय पांडे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला